तुम्हाला विधानसभेत उलटं टांगीन, भाजप नेते बबनराव लोणीकरांची पोलीस अधिकाऱयाला धमकी.

‘साहेब आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही? आमचे शंभर आमदार आहे, उद्या विधानसभेत उलटा टांगेन’,

मुंबई/ जालना:- भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱयालाच धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. गुटखा पकडण्याचे कर्तव्य बजावणाऱया सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना फोन करून विधानसभेत उलटं टांगू, अशी धमकीच लोणीकर यांनी दिल्याने सर्व स्तरांतून जोरदार टीका होत आहे.

तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना परतूरमधील एका व्यापाऱयाच्या घरी मोठय़ा प्रमाणावर गुटखा असल्याची टीप मिळाली होती. त्यानंतर पथकासह हसन गौहर यांनी त्या व्यापाऱयाच्या घरावर छापा टाकला, मात्र त्यांना छापेमारीत काहीच आढळून आले नाही. संबंधित व्यापाऱयाने घडलेली सर्व कwफियत भाजप नेते बबनराव लोणीकरांसमोर मांडली. त्यानंतर लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱयांना फोन करून धमकावल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर ‘कोर्टाच्या आदेशाशिवाय व्यापाऱयांच्या घरात घुसता कसे?’ असा सवाल त्यांनी अधिकाऱयांना करीत आहेत. त्यानंतर मिळालेल्या माहितीनंतरच धाड टाकली होती, पण त्यामध्ये काहीच आक्षेपार्ह सापडलं नाही असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितल्यावर बबनराव लोणीकर संतापले आणि त्यांनी विधानसभेत तुम्हाला उलटं टांगीन अशी धमकीच दिली.

माफी मागितल्याने प्रकरण मिटलं – लोणीकर
लोणीकर यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सदर पोलीस अधिकाऱयाने ज्या व्यापाऱयाच्या घरावर धाड टाकली होती त्याची माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटलं आहे, असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं आहे. याआधीही लोणीकर यांनी एका महिला तहसीलदार अधिकाऱयाविरोधात त्यांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सर्वच स्तरांतून लोणीकरांवर टीका होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here