२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा ८वा. वर्धापन दिनानिमित्त “लोकसत्ताक स्टडी सेंटर” मुंबई सायन येथे साजरा.

53

२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेचा ८वा. वर्धापन दिनानिमित्त “लोकसत्ताक स्टडी सेंटर” मुंबई सायन येथे साजरा.

घटना समितीने नेमलेल्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या घटनेचा अंतिम मसुदा हा घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केला,तो ऐतिहासिक क्षण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सुपूर्द करण्यात आले. हा दिवस आपण “भारतीय संविधान दिन” म्हणून देशभर साजरा करतो. भारतीय संविधान सर्वाना समान ,न्याय, हक्क,-अधिकार व एक समान दर्जा प्राप्त करून देते या भारतीय संविधानाचा भारतीयांसाठी अभिमान आहे.
“भारतीय लोकसत्ताक संघटना” ही भारतीय संविधानास प्रमाणबध्द मानून लोक हितासाठी कटिबद्ध राहून लोक कल्याणसाठी गेले अनेक वर्षांपासून भारतीय संविधानावर काम करत आहे.
२६ नोव्हेंबर “संविधान दिन” आणि “भारतीय लोकसत्ताक संघटनेचा” ८वा. वर्धापण दिन सोहळा यांचे औचित्य साधून सम्राट अशोक व्याख्यानमाला या व्याख्यान प्रारंभ सुरुवात २६ नोव्हेंबर २०२० ते २६ जानेवारी २०२१ पर्यत लोकसत्ताक स्टडी सेंटर येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाची सुरूवात पथनाट्य *माझं संविधान माझा सन्मान* विषयांवर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.सादरकर्ते मा.प्रितेश मांजलकर आणि सिद्ध आर्ट सर्व कलाकाराने उत्कृष्ट सादर करून जनजागृती प्रबोधन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण मा.प्रा.विजय मोहिते सर आणि दीप प्रज्वलन स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या मा.मंदा मोरे आणि मा.सुषमा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मा.सुप्रियाताई मोहिते यांनी भारतीय संविधनाची प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
भारतीय लोकसत्ताक संघटनेचे सरचिटणीस मा.वैभव मोहिते सर यांनी संविधान दिन व संघटनेचा ८वा वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त केली. आणि संघटनेने आठ वर्षे पूर्ण होत असताना संघटनेने आतापर्यत कार्यक्रम आयोजित माहिती देण्यात आली. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी “इंडियन युथ पार्लमेंट”सुरुवात ,२६जानेवारी गणतंत्र दिन दरवर्षी घटनाकारांना चैत्यभूमी येथे अभिवादन करून चैत्यभूमी दादर ते गेट वे ऑफ इंडिया पर्यत संविधान रॅलीचे आयोजित (कुपरेज येथेल पूर्णाकृती पुतळा )येथे अभिवादन करून समारोप केला जातो, “१४ एप्रिल दिवस”,चला संकल्प करूया “राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रध्वजात साजरी करूया”. १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उप शहरात वेगवेगळ्या विभागात जाऊन “भारतीय संविधानाने” मुलभूत-अधिकार,हक्क-कायदाविषयी पथनाट्याचा माध्यमातून दरवर्षी सादरीकरण केले जाते. १८ऑक्टोबर २०१८ रोजी “मंजिल” शॉटफिल्म जाती विषयांवर निर्मिती. २१ नोव्हेंबर २०१८रोजी दादर चैत्यभूमी येथे शासनाने “राष्ट्रध्वज” लागलाच पाहिजे संघटनेची मागणी. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या मुद्या विषयांवर स्वाक्षर मोहीम दरवर्षी राबवली जाते. १७ जानेवारी २०१८ रोजी “कास्ट फ्री इंडिया” दादरमध्ये जातीय निर्मूलन बंधुता रॅली प्रबोधनकार ठाकरे पुतळा ते चैत्यभूमी येथे करण्यात आली. २७ मे २०१९रोजी “जातमुक्त भारत झालंच पाहिजे”संघटनेची मागणी नायर हॉस्पिटल येथे डॉ.पल्लवी तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. १५सप्टेंबर२०१९ रोजी “एक हात मदतीसाठी” जिल्हा सातारा येथे पूरग्रस्त लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना मदत. १०नोव्हेंबर२०१९रोजी “प्रेषित the prophet” या नाटकाचा प्रयोग लावून लोकसत्ताक स्टडी सेंटर उभारणीसाठी निधी मदत. ३ जानेवारी २०२० रोजी सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त “लोकसत्ताक स्टडी सेंटर” मुंबई सायन येथे संघटनेच्या वतीने स्थापना करण्यात आले. अशा सर्व संघटनेने भूमिकाबाबत केलेल्या कामाची सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख मा.अजय तायडे सर यांनी संघटनेच्या ८वा वर्धापण दिनानिमित्त ऑनलाईन सदस्य सभासद नोंदणी होण्यासाठी माहिती देण्यात आली आणि सर्वांनी सदस्य ,सभासद नोंदणी मध्ये सहभागी होण्यासाठी सांगण्यात आले.
व्याख्यानमाला या व्याख्यान प्रारंभ सुरुवात सदर २६ नोव्हेंबर २०२० ते २६ जानेवारी २०२१ पर्यंत लोकसत्ताक स्टडी सेंटर येथे आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाची प्रथमच सम्राट अशोक व्याख्यानमालेचे सुरुवात म्हणून प्रमुख वक्ते मा.प्रा. विजय मोहिते सर (सिद्धार्थ महाविद्यालय) यांनी भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास विषयी संविधान लिहिण्यापूर्वी भारतीय संस्कृती ही वर्णव्यवस्था असल्यामुळे इथल्या लोकांना हक्क-अधिकार पासून वंचित ठेवण्यात आले.तसेच धार्मिक ग्रंथ वेद पुराण सत्य परिस्थिती त्याविषयी माहिती लोकांसमोर सांगण्यात आले. तसेच भगवान बुद्ध व साम्राट अशोक काळापासून ऐतिहासिक संशोधन माहिती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर येण्यासाठी अडचणी त्रास कसा निर्माण झाल्या त्या संदर्भात लोकांसमोर वास्तव, सत्य मांडण्यात आले .संविधान दिन हा एका जाती-धर्माचा नाही आहे, संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे.आणि प्रत्येक नागरिकांनी संविधान दिन साजरा करावा संविधानामुळे हक्क अधिकार मिळाले.उपस्थित असलेल्या जनसमूहाला प्रबोधन करण्यात आले.
भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा.अमोलकुमार बोधिराज सर यांनी प्रथम संविधान दिन आणि संघटनेचा ८वा.वर्धापन दिनानिमित्ताने सर्वाना शुभेच्छा दिल्या आणि भाषणांत आपली संघटनेची भूमिका जबाबदारी स्वीकारली असताना संघटनेची ध्येय, उद्दिष्टे आणि भारतीय संविधान प्रस्ताविका हीच आमची भूमिका तसेच भारतीय संविधानाची अमंलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडणे हे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.संघटना प्रत्येक संघटनेच्या कार्यक्रम आयोजित करत असताना “राष्ट्रध्वज” लावूनच कोणत्याही उपक्रमात सुरुवात करणे या भूमिकेवर ठाम असतो.जय भारत,जय संविधान आम्ही का म्हणतो त्याचाही लोकांना खुलासा करण्यात आला.तसेच स्थानिक आदर्श सामाजिक प्रतिष्ठान(रजि), तक्षशिला महिला मंडळ यांचे कार्यकर्ते स्थानिक रहिवासी यांनी स्टडी सेंटरसाठी दिलेल्या जागेबाबत योगदान मोठे आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकाराने हे लोकसत्ताक स्टडी सेंटर उभे आम्ही करू शकलो .स्टडी सेंटरमध्ये अनेक उपक्रम राबवत आहोत सद्या आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू आहे मा.उमेश जाधव सर जबाबदारीने शिकवत आहे.त्याबद्दल संघटनेच्या वतीने सर्वाचे आभार व्यक्त केले.संघटना हे मुद्दे घेऊन *एक समान दर्जाचे आणि मोफत KG TO PG शिक्षण सर्वासाठी शासनाकडून उपलब्ध व्हावे. *एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज पूर्ववत करून शासकीय निमशासकीय तसेच पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यामधील भरती एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मार्फत करण्यात यावी. *शेतकरी कल्याणासाठी स्वामिनाथन आयोगाची तात्काळ अमंलबजावणी करण्यात यावी. *ईव्हीएम मशिन निवडणूकीतून हद्दपार करून बॅलट पेपरवरतीच घेण्यात याव्यात.अशा अनेक मुद्यावर संघटना काम करत आहे तसेच संघटनेची ताकत वाढविण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आपली गरज आहे.
कार्यक्रम समारोप करण्यासाठी संघटनेचे सहचिटणीस मा.मनिष जाधव यांनी २६ नोव्हेंबर संविधान दिन आणि भारतीय लोकसत्ताक संघटना ८ वा.वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धामध्ये सहभागी विजेता स्पर्धकांची नावे (१)प्रथम क्रमांक: मिलिंद सु.जाधव ( ठाणे ), २)द्वितीय क्रमांक: नामदेव गुलदगड (पुणे), ३)तृतीय क्रमांक: स्मृती र.कांबळे ( मुंबई), ४)विशेष पारितोषिक : कु.स्मृतिका पां.ढवाणपाटील (पुणे) या सर्व विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन तसेच राज्यभरातून राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांनी भरभरून दिलेल्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आणि वेळात वेळ दिलेला सहभाग याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि सदर विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र २६ जानेवारी २०२१ रोजी देण्यात येईल असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.तसेच मुंबई भरातून वेगवेगळ्या विभागातून आलेल्या कार्यकर्ते मान्यवर उपस्थित स्थानिक रहिवासी ,कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले आणि समारोप करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन मा.जान्हवीताई सावर्डेकर मुंबई जिल्हा अध्यक्ष भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ यांनी केले.
फेसबुक लाईव्ह प्रसारण जबाबदारी मा.मितेश वळंजू सर यांनी केले.
दिवाकर कदम,विशाल गायकवाड,सनी कांबळे, मंगेश खरात, किशोर येडे, किरण गमरे,पिलाजी कांबळे,गुणवंत कांबळे,प्रेमसागर बागडे,आकाश मोरे,प्रथम कदम,मयुरेश जंगम,कमलेश मोहिते, मेहुल सोळंकी,मनिष जाधव,प्रणव सपकाळ,श्रेयश जाधव, योगेश कांबळे, विशाल पवार ,शैलेश सोनावणे,मनिष कदम संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गुणवंत कांबळे
प्रतिनिधी