पवईत पूलाचा भाग कोसळला, आरेकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद.

54

पवईत पूलाचा भाग कोसळला, आरेकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद

राज शिर्के पवई प्रतिनिधी

पवई;- चा हा पूल अत्यंत धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणा-या मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. प्रवाशांनी हा मार्ग बदलून जेवीएलआर या मार्गावरुण प्रवास करवा असे आवाहन पालिका आणी पोलीसा कडुन करण्यात आले आहे.

 

पवईतील आरे कॉलोनीकडे जाणा-या मार्गावर असणारा मीठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे प्रशासना तर्फे दोन वर्षा अगोदर या पुलाला धोकादायक घोषित करण्यात आले होते. प्रशासनाच्या दुर्लक्षित वृत्तीमुळे आज जनतेला आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मार्ग बंद केल्यामुळे जनतेला आपले घर ऑफ़िस गाठण्याकरिता लाम पल्याचा मार्गवरुन प्रवास करावा लागत आहे.

 

विहार तलाव येथून उगम पावणा-या मीठी नदीवर इग्रंजाच्या काळात या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. दगडाने बांधण्यात आलेला हा पुल किनाराजवळील भागात अजूनही मजबूत आहे. मात्र शॉर्टकट मार्गावरील अवघड ओवरलोड वाहने या पुला वरुन जात असल्यामुळे काही वर्षा पासुन या पुलाची अवस्था खुप दयनीय झाली होती. या दुरावस्थेबाबत स्थानिक नागरीकानी पलिकेला अनेक तक्रारीकेल्या नंतर 2019 साली हा पुल धोकादायक ठरवत येथून अवजड वाहनांना आणी बस जाण्यास बंदी घालण्यात आली.