पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून; कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा.

यवतमाळ :- वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पाच जणांना ताब्यात घेत साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने जुगारींमध्ये खळबळ उडाली आहे.

जीवन काकडे वय 28, पिंपरी, संदीप बांदुरकर वय 28, रा. पिंपरी, सुभाष लोंढे वय 45, भास्कर वाचोसे वय 45, रा. येन्नापूर, जि. चंद्रपूर व मारोती खंडाळकर वय 60, असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. पिंपरी येथील जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची टीप शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला.

पोलिस आल्याची चाहूल लागताच 10 ते 15 जण पळून गेलेत. पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ दुचाकी, मोबाईल व रोकड, असा एकूण पाच लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

लपतछपत जुगारींना घेतले ताब्यात

पिंपरी येथील जंगलात मागील काही महिन्यांपासून कोंबड बाजार सुरू होता. मात्र, कधी छापा टाकून कारवाई करण्यात आल्याचे समजले नाही. जुगारींना संशय येऊ नये, म्हणून शेतकऱ्यांचा वेश परिधान केला आणि लपत-छपत जाऊन जुगारींना ताब्यात घेतले. तरीही पोलिसांची चाहूल लागल्याने दहा ते 15 जण पळून गेलेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here