हिंगणघाट: मृतक कामगाराच्या परिवाराला वर्धा जिल्हा मजदूर संघटने तर्फे आर्थीक मदत.

56

हिंगणघाट: मृतक कामगाराच्या परिवाराला वर्धा जिल्हा मजदूर संघटने तर्फे आर्थीक मदत.

हिंगणघाट: मृतक कामगाराच्या परिवाराला वर्धा जिल्हा मजदूर संघटने तर्फे आर्थीक मदत.
मृतक कामगाराच्या परिवाराला वर्धा जिल्हा मजदूर संघटने तर्फे आर्थीक मदत.

✒️ मुकेश चौधरी ✒️
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
📲 7507130263 📲
हिंगणघाट:- तालुक्यातील वणी येथील गिमा टेक्सस्ट्राईल कापड गिरणी मध्ये काम करणारे कामगार राजु गेडेकर हे रिंगफ्रेम काँटन या युनिट मध्ये कार्यरत होते. त्याचा दिनाक 18 ऑगस्ट ला दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतक मिल कामगाराच्या घरची परस्थिती हलाखीची असल्यामुळे वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेने गिमा टेक्सस्ट्राईल वणी येथील कापड गिरणीच्या संचालक आणि व्यवस्थापनास मृतक कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यासाठी पाठपुरावा करून सर्व कामगाराच्या पगारातून प्रती 100 रुपये प्रमाणे कपात करुन त्याच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून एकुण रक्कम 151800 रुपयाचा धनादेश देऊन आपली सामाजिक जवाबदारी निभवली.

मृतक कामगाराच्या परीवाराला चेक देते वेळी उपस्थित संघटनेचे सचिव पांडुरंग बालपांडे, दामोधर देशमुख, अश्विन ढाले, प्रशांत शेळके, जयंत बावणे, विनोद कोल्हे, लक्षण जयपुरकर, राहुल देशमुख, विजय थुल, हेमंत भगत, दिवाकर बरबटकर गणेश बरडे, प्रमोद येरेकर, विनोद कावळे तसेच व्यवस्थापन पैकी डी.जी.एम गायकवाड साहेब, पराग जुमडे, सोमेश्वर साटोणे ईत्यादीची उपस्थित होती.