मुंबई: दौंडच्या DYSP नी छेडछाड करण्याचा आरोप करत, पुण्यातील महिला वकीलने मंत्रालयाबाहेर केला आत्महत्येचा प्रयत्न.

✒मुंबई महानगर प्रतिनिधी✒
● पुणे जिल्ह्यातील दौंड येथील वकील महिलेने मुंबईतील मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
● दोंडचे पोलीस उपअधीक्षक यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा महिलेचा खळबळजनक दावा.
मुंबई:- मुंबईच्या मंत्रालयाच्या बाहेर पेशेने वकील असलेल्या एक महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामूळे काही वेळेसाठी पोलिसांची ताळाबंद उडाली होती. पुणे जिल्ह्यातील दौंड येथील पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत गैरवर्तन करुन छेडछाड केल्याचा खळबळजनक आरोप त्या महिलेने केला आहे.
गैरवर्तन करुन छेडछाड या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने ती वकील महिला मुंबईत येऊन मंत्रालय परिसरात तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या. आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. विचार पूस सुरु झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथील वकील महिलेने मुंबईतील मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोंडचे डीव्हायएसपी (पोलीस उपअधीक्षक) यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिलेने केला आहे.
पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार करुनही कारवाई केली जात नव्हती. पोलिसांकडून महिलेवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाद मागण्यासाठी वकील महिला वारंवार वरिष्ठ पोलिसांची भेट घेत होती, तरीही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत तिने टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक म्हणजे महिलेने तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सबंधित महिला मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे.