नागपुर: कोराडी औष्णिक वीज केंद्रात कोळसा घोटाळा, तीन अधिकारी निलंबित.

54

नागपुर: कोराडी औष्णिक वीज केंद्रात कोळसा घोटाळा, तीन अधिकारी निलंबित.

नागपुर: कोराडी औष्णिक वीज केंद्रात कोळसा घोटाळा, तीन अधिकारी निलंबित.
नागपुर: कोराडी औष्णिक वीज केंद्रात कोळसा घोटाळा, तीन अधिकारी निलंबित.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲

नागपूर:- नागपुर जिल्हातील कोराडी औष्णिक वीज केंद्रात कोळसाच्या वाहतूकी मध्ये घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामूळे कोराडी औष्णिक वीज केंद्रातील कोळसा वाहतूकीला भष्ट्राचाराचे ग्रहण लागले आहे. त्यामूळे कोराडी औष्णिक वीज केंद्रातील कोळसा वाहतूक घोटाळ्या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महाजेनकोचे खनिकर्म निदेशक पुरुषोत्तम जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरविली आहे. समितीच्या शिफारशीनुसार कोराडी केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी तिन्ही अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे. आता विभागीय चौकशीच्या अहवालावर या अधिकाऱ्यांचे भविष्य अवलंबून आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी, उपकार्यकारी अभियंता नरेश सिंह व सुरक्षा अधिकारी शरद पांडे यांचा समावेश आहे.

नागपुर जिल्हातील महत्वपुर्ण कोराडी वीज केंद्रात वापरा साठी येणारा कोळसा अर्धा रस्त्यात अदला बदली केली जात होती. हे प्रकरण 27 सप्टेंबर ला रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आले होते. चांगल्या दर्जाचा कोळसा काढून निकृष्ट दर्जाचा कोळसा वीज केंद्रात पाठविला जात होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर, त्यांनी यासंदर्भात खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 30 सप्टेंबर रोजी रात्री पोलिसांनी तक्रार दाखल केली होता.

कोळसात सुरु असलेला भष्ट्राचार बघता महाजेनकोने जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली होती. पण या समितीचे एक सदस्य कोरोना वायरस बाधित झाल्याने या भष्ट्राचाराच्या चौकशीला उशीर झाला, नंतर सदस्य बरे झाल्यानंतर समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालात गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारण्यात आली नाही. तसेच अधिकारी, जीएसएस कंपनी आणि ट्रान्सपोर्टर यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. समितीने या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करून तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात आणखी एक कनिष्ठ सुरक्षा अधिकारीही निलंबित करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संबंधित अधिकारी सध्या बाहेर प्रशिक्षणावर असल्याने, त्यांना तो निलंबनाचा आदेश देण्यात आला नाही. सोमवारी तो आदेश त्यांना देण्यात येईल. एकूण या प्रकरणात चार जण निलंबित करण्यात आले आहेत.