नगरपंचायत होणार की नाही, तळोधीवासीय संभ्रमात

53

नगरपंचायत होणार की नाही, तळोधीवासीय संभ्रमात

नगरपंचायत होणार की नाही, तळोधीवासीय संभ्रमात
नगरपंचायत होणार की नाही, तळोधीवासीय संभ्रमात

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : -चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी( बा.) व भिसी हया दोन गावाला नगरपंचायतिचा दर्जा देण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला होता.त्या अनुषंगाने दोन दिवसाआधी भीसी ला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. मात्र तळोधी( बा.) ला यावेळी डावलण्यात आले त्यामुळे तळोधी( बा.) नगरपंचायत होणार की नाही याविषयी जनता संभ्रमात आहे. नागभीड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी बा.) ची ओळख आहे. तळोधी (बा ) येथे नवोदय विद्यालय, दोन सीनिअर कॉलेज, विज्ञान महाविद्यालयात, दोन हायसकूल, धानाची मोठी बाजारपेठ, अपर तहसील कार्यालय, कृषी ऑफिस, वनविभाग कार्यालय,पोलीस स्टेशन, अशी महत्वाची कार्यालये तळोधी ला आहेत. त्याअनुषंगाने गावाचा ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही जर नगरपंचायतिचा दर्जा जर प्राप्त झाला तर गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
तळोधी (बा.)व भिसी या दोन्ही गावाचा ज्यावेळी प्रस्ताव तयार करण्यात आला त्यावेळी २०११ च्या जनगणनेनुसार ३५० लोकसंख्या कमी पडत होती. त्यासाठी तळोधी (बा) ला लागून असलेल्या ओवाळा या गावाने नगरपंचायतिसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते त्यामुळे नगरपंचायत होण्यासाठी काहीही अडचण नव्हती. परंतु नेमकी माशी कुठे शिंकली हे कळत नाही आहे.
एकाच वेळी प्रस्ताव गेल्याने दोन्ही नगरपंचायत एकाच वेळी होनार अशी अपेक्षा होती मात्र भिसीला वेगळा न्याय आणि तळोधी( बा )ला वेगळा न्याय कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चिमूर क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटी भांगडीया यांनी याबाबत दोन्ही गावाला नगरपंचायतिचा दर्जा प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न केले. परंतु तळोधी (बा )ला न्याय देण्यात नेमके काय झाले ह्याबाबत प्रश्नच आहे. आमदार महोदयांकडून लवकरात लवकर तळोधी (बा.)ला गोड बातमी मिळावी हीच सर्व जनतेची ईच्छा आहे.

*कोट* — तळोधी( बा.)ला नगरपंचायतिचा दर्जा देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे,काही तांत्रिक अडचणी मूळे ही प्रक्रिया थांबली आहे मात्र लवकरच तळोधीला ही नगरपंचायतिचा दर्जा प्राप्त होईल. *बंटी भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र*