नागभीड येथे राज्याचे कृषी मंञी दादाजी भुसे यांच्या हस्ते शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन.
अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभीड :- नागभीड तालुका शिवसेनाच्या वतिने ब्रम्हपुरी रोड जुना बस स्टांप येथे अकाली पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले ते पाहणीकरिता राज्याचे कृषी मंञी दादाजी भुसे चंद्रपुर जिल्हाच्या दौऱ्यावर दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे कृषी मंञी दादाजी भुसे, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या उपस्थितित ढोल-तासाच्या गजरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे शुभ हस्ते फित कापून उद्दघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख यांनी मंञी महोदय यांना पुच्छ-गुच्छ देवून स्वागत केले, नगरपरिषद श्रेञातील शेतकऱ्यांचे कृषी योजना बंद झाले आहे ते चालु करण्यात यावे. शेतकऱ्यांना शेतापंर्यत जाण्यासाठी पांदन रस्ते, तलावाचे खोली करण, मजबुती करण, जे शेतकरी नियमित कर्जाची परफेड करतात यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मदत द्या, अकाली पावसामुळे शेतकऱ्याचे कापलेले धान पिक पावसाने भिजुन खराब झाले. शेतकऱ्यांना सरसकट मदत देवून संपूर्ण कर्ज माफी करावी. तालुकात शेतकऱ्यांचे धानाचे पुजंने जळाले त्यांनाही मदत द्यावी. नागभिड येथील शासकीय धान खरेदी केंद्र अजूनही सुरु झाले नाही, ते त्वरित सुरु करुण धानाला अजुन बोनस जाहिर केलेला नाही तो सुध्दा 1000 रुपये बोनस जाहीर करावे, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हिताचे मुद्दे व अश्या विविध मांगण्याचे निवेदन राज्याचे कृषी मंञी दादाजी भुसे यांना देण्यात यावेळी शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार, उप तालुका प्रमुख मनोज रडके, शहर प्रमुख क्षिकांत पिसे, मनोज वाढई, शिवसेनेचे प्रशिध्द वृतपञ प्रमुख अरुण भोले, विक्की मडकाम, सुधाकर बोरकर, अमोल अमृतकर, प्रमोद राहुत, ईश्वर नागरिकर बालू चिलमवार, नंदु खापडॅ, अरुण खापरे, राजा शाबरी, दिनकर भोले, प्रशिल निमगडे समस्त युवा सेना, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्खेनी उपस्थित होते.