शालेय विकासासह,आरोग्य व गावातील अंतर्गत विकासासाठी सदैव प्रयत्न करणार: जि.प. सदस्या, वैष्णवीताई बोडलावार

49

शालेय विकासासह, आरोग्य व गावातील अंतर्गत विकासासाठी सदैव प्रयत्न करणार: जि.प. सदस्या वैष्णवीताई बोडलावार

हिवरा येथील जि.प.शाळेतील दोन वर्ग खोली बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न.

शालेय विकासासह, आरोग्य व गावातील अंतर्गत विकासासाठी सदैव प्रयत्न करणार: जि.प. सदस्या वैष्णवीताई बोडलावार
 गावातील अंतर्गत विकासासाठी सदैव प्रयत्न करणार: वैष्णवीताई बोडलावार

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- आज दि.30 नोव्हेंबर मंगळवारला दुपारी ११:०० वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा येथे दोन वर्गखोली बांधकामाचा भूमिपूजन सोहळा चंद्रपूर जि.प.सदस्या वैष्णवीताई बोडलावार यांचे हस्ते संपन्न झाला.

हिवरा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ली ते ८ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील २० ते २५ वर्षे पूर्वी बांधकाम केलेली दोन वर्गखोली इमारत पूर्णपणे निष्कामी झाल्याने तिला निर्लेखित केल्या गेले. त्यामुळे अडचणीत असलेल्या वर्ग खोली बांधकाम अभावी ८ वर्ग बसवितांना अडचण निर्माण होत होती यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकाना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

सदरची अडचण बघता ग्रामपंचायत हिवरा यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणीचा प्रस्ताव सादर केला. जिल्हा परिषद सदस्य वैष्णवीताई बोडलावार यांचे प्रयत्नांनी आज जिल्हा परिषदेच्या वार्षिक निधीतून बांधकाम विभाग पोंभूर्णा अंतर्गत दोन खोली बांधकाम मंजूर झाले. आज सौ.वैष्णवीताई बोडलावार यांचे शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक जि.प. सदस्या सौ. वैष्णवीताई बोडलावार यांनी सांगितले की, शालेय विकासासह, आरोग्य व गावातील अंतर्गत विकास कामांसाठी माझे गावासाठी सतत सहकार्य राहील व त्यासाठी आपण जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या विभागामार्फत निधी मंजूर करू अशी ग्वाही भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना दिली.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने अरुणभाऊ कोडापे उपसभापती प.स. गोंडपिपरी, निलेशभाऊ पुलगमकार सरपंच ग्रा.प.हिवरा, सौ. वर्षाताई कुत्तरमारे उपसरपंच ग्रा.प.हिवरा जितेंद्र गोहणे ग्रा.पं.सदस्य तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष हिवरा, देवानंद आक्केवार सदस्य ग्रा.प.हिवरा, श्री. उमेश पुलगमकर सदस्य शा.व्य.स.हिवरा, जि.प. बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता श्री. राठोड साहेब, जि. प. शाळा हिवराचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रा.पं. कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.