जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात गोकुळधाम येथे उभारले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅटमिंटन कोर्ट

56

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात गोकुळधाम येथे उभारले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅटमिंटन कोर्ट

पूनम पाटगावे 

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

मो. नं. ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- महाराष्ट्राबरोबरच देशाला अधिक उत्तम दर्जाचे खेळाडू मिळावे तसेच तरुणांमध्ये खेळाला अधिक वाव देण्यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी गोकुळधाम येथे आमदर निधीतून उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. हे कोर्ट सुरु करण्यात आल्यानंतर बॅडमिंटन प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

          जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात गोकुळधाम येथे यशोधाम वेलफेअर असोसिएशनचे मैदान आहे. या मैदानात जनतेच्या मागणीनुसार बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात यावे अशी मागणी वेलफेअर असोसिएशन यांनी आमदारांकडे केली होती. विभागाचे माजी नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार विकास कार्यक्रमांतर्गत अंदाजे तब्ब्ल ३८ लाख खर्च करून म्हाडाच्या माध्यमातून हे कोर्ट तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्र तसेच देशपातळीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आमदर वायकर यांच्या आमदर निधीतून हे कोर्ट उभारण्यात आले आहे.

या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशाला उपलब्ध होतीलच त्याचबरोबर महाराष्ट्रात एक नंबरचे कोर्ट ही त्याची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचबरोबर या कोर्टामधून आंतरराष्ट्रीय तसेच देशपातळी स्तरावर खेळाडू तयार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी आशाही वायकर यांनी व्यक्त केली. या अगोदर स्थानिक रहिवाश्याच्या मागणीनुसार या मैदानात जॉगिंग ट्रॅक, संध्याकाळ नंतर व्हॉलीबॉल, क्रिकेट, खेळण्यासाठी विजेची व्यवस्था, संरक्षक भिंत, समाज मंदिर आदी सुविधाही आमदर निधीतून वायकर यांनी करून दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना सर्व सोईयुक्त असे सुसज्ज मैदान लाभल्याने स्थानिक मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेत आहेत.

 या कोर्टाच्या लोकापर्णावेळी आमदार रविंद्र वायकर यांच्यासह पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.