पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते डॉ आरीफ पागारकर भूषण पुरस्काराने सन्मानित

59

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते डॉ आरीफ पागारकर भूषण पुरस्काराने सन्मानित

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव : सन्मान जिल्ह्याचा, सन्मान कर्तृत्वाचा, जिल्हा स्तरीय भूषण पुरस्कार सन्मान सोहळा ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशने, पुणे ह्यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे सभागृहात २६ नव्हेंबर रोजी आयोजित केला होता.

 महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील आपल्या जिल्ह्यात विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्यांच्या सन्मान सोहळा होता.

ज्येष्ठ पत्रकार डॉ आरीफ पागारकर यांना ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन रायगड भूषण पुरस्कार – लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड इन जर्नलिज्मने पद्मश्री पोपटराव पवार ह्यांच्या शुभहस्ते आणि शेकडो नागरिकांच्या साक्षीने सन्मानित करण्यात आला. डॉ पागारकर हे गेल्या ३ दशके पेक्षा जास्त कालावधी करत असलेल्या पत्रकारितेची दखल ग्लोबल स्कॉलर्सने घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रधान केले.

डॉ पागारकर हे राष्ट्रीय नोंदणीकृत इंडियन प्रेस क्लब रायगड जिल्हाध्यक्ष असून अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

डॉ आरीफ पागारकर रत्नागिरीचे सुपुत्र असून रायगडला आपली कर्मभूमी समजून गेली २ दशके पत्रकारिते बरोबरच वैद्यकीय सेवा देत आहेत. ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील बेलगावे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या सुनियोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते.