को.ए.सो. रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल, बामणगांव येथील मुली झाल्या स्वयंसिद्धा…

29
को.ए.सो. रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल, बामणगांव येथील मुली झाल्या स्वयंसिद्धा...

को.ए.सो. रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल, बामणगांव येथील मुली झाल्या स्वयंसिद्धा…

को.ए.सो. रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल, बामणगांव येथील मुली झाल्या स्वयंसिद्धा...
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने आयोजित को.ए.सो. रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल, बामणगांव येथील मुलींसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण अनुप गुप्ता – मुख्य महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल उसर व जितिन सक्सेना – महाप्रबंधक, शितल लाकरा – मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास अजित कुरेकर- डीजीएम फायर अँड सेफ्टी, गेल इंडिया लिमिटेड उसर, सुलोचना नितीन पाटील मानव संसाधन ऑफिसर- गेल इंडिया लिमिटेड, उसर, उर्मिला संभाजी घरत- प्रभारी मुख्याध्यापिका, को.ए.सो. रामभाऊ मोरेश्वर पाटील हायस्कूल, बामणगांव, तपस्वी नंदकुमार गोंधळी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा अध्यक्षा प्रिझम सामाजिक विकास संस्था, सुरेखा श्रीकृष्ण झोपे- सहा. शिक्षिका, स्नेहल संतोष पालकर- सहा. शिक्षिका, अनिल तुकाराम पाटील- सहा. शिक्षक, नाशिकेत गजानन पेढवी- सहा. शिक्षक, निता विलास डोळस-सहा. शिक्षिका, मिरा रिनेश गावित- सहा. शिक्षिका, वैशाली भालचंद्र वर्तक- सहा. शिक्षिका स्वयंसिद्ध प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर, हर्षाली नागावकर, वेदिका लाडगे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला घरत यांनी गेल इंडिया लिमिटेड उसरचे आभार मानीत स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व मुलींना सांगितले प्रशिक्षणात सहभागी झालेल्या मुलींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अजित कुरेकर डीजीएम फायर अँड सेफ्टी त्यांनी देखील मुलींबरोबर संवाद साधत स्वतःचा बचाव आणि इतरांचे रक्षण करण्याकरिता दिलेल्या प्रशिक्षणाचा नियमित सराव करणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले व प्रिझम सामाजिक विकास संस्थेस शुभेच्छा दिल्या तर तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसाच्या स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरामध्ये कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, नियमित सरावाचा फायदा याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनी देखील या प्रशिक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले तसेच अशा प्रकारचे प्रशिक्षण जास्तीत जास्त दिवस देण्यात यावे असेही आपल्या मनोगतामध्ये सांगितले. या प्रशिक्षणास बहुसंख्य विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.