Home latest News शेजाऱ्यांनीच कापला केसाने गळा; तब्बल ७० दिवसांनी झाला चोरीचा उलगडा
शेजाऱ्यांनीच कापला केसाने गळा; तब्बल ७० दिवसांनी झाला चोरीचा उलगडा
अनेक वर्ष घरोबा असलेले शेजारीच ठरले चोरी प्रकरणी दोषी
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल: कामोठे परिसरातील प्रतिक जेम्स या गृह संकुलातील रहिवाशी सविता म्हस्कर यांच्या राहत्या घरातून तब्बल २५ लाख किंमती रुपयाचे सोने चोरी प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याला कारणही तसेच होते, तपास अधिकारी यांनी फिर्यादी यांनाच फैलावर घेऊन प्रकरण तुमच्याच अंगाशी येऊ शकते असा सूचना वजा इशारा दिला असल्याचं फिर्यादींनी सांगितलं होत.
दागिने लंपास केल्याच्या घटनेला दिवस ४० दिवस उलटूनही कामोठे पोलिस अद्याप चोराच्या शोधतच आहेत, असा आरोप सविता म्हस्कर आणि कुटुंबांनी पत्रकार परिषदेत केला होता.
अखेर तपास अधिकारी बदलीची मागणी करण्यात आली, प्रसारमाध्यमांच्या दबाव वाढला आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरली.तब्बल ७० दिवस उलटून गेल्यावर म्हसकर कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे; त्याच कारण सख्खे शेजारीच पक्के वैरी निघाल्याचा अनुभव त्यांना आला. चोरी प्रकरणाच्या तपासामध्ये म्हसकर कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार शेजारी मोनिका दिघे हिनेच चोरी केल्याचं सिद्ध झाला आहे; परंतु या प्रकरणात मोनिका दिघे हिचे पति सोबत त्यांना पाठिंबा देणारे सामिल आहेत का? याचीही चौकशी करून त्यांनाही कठोर शासन झालं पाहिजे अशी म्हसकर कुटुंबियांनी मागणी व्यक्त केली. या तपासातून हे स्पष्ट झाले की,
दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळच्या सुमारास घरातील सोने चोरी करण्यात आले. तर
दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सदरचे सोने दादर, मुंबई येथील सराफाकडे विकले गेले. त्यातील काही दागिने विकून रोख रक्कम वापरण्यात आल्याचं सांगितलं तर उर्वरित तपास करण्याचं कामं सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
आरोपीने सतत पोलिसांना आणि आम्हाला दिशाभूल केल्यामुळे हा गुन्हा उघडकीस येण्यासाठी वेळ लागल्याचं पोलिसांनी सांगितले.
या संपूर्ण तपासामध्ये सहकार्य केलेबद्दल
पोलिस आयुक्त मिलींद भारांबे ,
पोलिस उपायुक्त श्री मोहिते,
सहाय्यक पोलिस आयुक्त कदम
कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे,
सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश दळवी व संपूर्ण टीम यांचं म्हसकर कुटुंबीयांनी आभार मानले.”सत्य परेशान होता हैं| पराजय नहीं|” अशी भावना
म्हसकर कुटुंबीयांनी व्यक्त केली,
तसेच आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून खंबीरपणे उभे राहून मानसिक व कायदेशीर पाठबळ देणारे, आणि आमच्या दागिने मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे राजकुमार पाटील व राजश्री पाटील, विजय लोटेकर आणि त्यांचा सर्व परिवार यांच्या आम्ही विशेष आभारी आहोत.
तसेच आमची बाजू सतत समाजाच्या हितासाठी मांडणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे देखील मनःपूर्वक आभार त्यांनी मानले.