डॉ. मुनीर तांबोळी यांची केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी पुन्हा वर्णी

62

डॉ. मुनीर तांबोळी यांची केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी पुन्हा वर्णी

कृष्णा गायकवाड
पनवेल तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल: पत्रकारांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ. मुनीर तांबोळी यांची पुन्हा एकदा फेर निवड करण्यात आली आहे. तांबोळी यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

डॉ. तांबोळी यांनी मागील कार्यकाळात पत्रकार संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक मजबूत आणि मोठे जाळे निर्माण केले आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय आणि उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या याच प्रभावी नेतृत्वाची आणि निष्ठेची दखल घेत, त्यांना या अत्यंत महत्त्वाच्या पदावर पुन्हा नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. मुनीर तांबोळी यांच्याकडे पत्रकारितेचा दांडगा अनुभव आहे. ते हिंदुस्तान २४ तास न्यूजचे संपादक म्हणून कार्यरत आहेत, तसेच रायगडचा शिल्पकार या वृत्तपत्रातही ते कार्यकारी संपादक म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत.
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी यांनी डॉ. तांबोळी यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
आपल्या फेरनिवडीनंतर डॉ. तांबोळी यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पत्रकारांच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, “मी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे आणि यापुढेही प्रामाणिकपणे कार्य करत राहीन.”
यासोबतच, संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी त्यांनी लवकरच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ते म्हणाले की, लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. यामुळे संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होऊन राज्यातील तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. डॉ. तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य महाराष्ट्रात अधिक जोमाने वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.