जनकल्याण सामाजिक बहु. संघटना महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न.

61

जनकल्याण सामाजिक बहु. संघटना महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न.

जनकल्याण सामाजिक बहु. संघटना महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न.
जनकल्याण सामाजिक बहु. संघटना महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न.

अनिल अडकिने
सावनेर तालुका प्रतिनिधी

मो.नंबर-9822724136*

सावनेर-30 डिसेंबर2021
अन्याय, अत्याचार ,भ्रष्टाचार निवारणार्थ तसेच सामाजिक न्यायासाठी जनकल्याण सामाजिक बहु संघटना महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा व कोविड-19 मध्ये सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी व समाज सेवकांचा सत्कार सोहळा 29 डिसेंबर बुधवारला सकाळी 11 ते 5 पर्यंत राम गणेश गडकरी सभागृह धापेवाडा रोड सावनेर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.अभीविलास नखाते साहेब (संस्थापक गुरुदेव नागरी पत संस्था तथा फर्म शिवतीर्थ टुरिझम उमरी डॅम),कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.भगवानजी चांदेकर (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश) होते.या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत तथा दैनिक निर्भीड चे संपादक सेवकरामजी राऊत साहेब,युवराज मेश्राम( मीडिया वार्ता न्यूज चायनल चे पत्रकार),तसेच या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दिनेशभाऊ इंगोले अध्यक्ष जय सामाजिक शिवाजी संस्था, विनोदजी मानकर जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,अनिल अडकिने पत्रकार,सिद्धार्थ मांडवे, शांतारामजी ढोके,संगीता भक्ते,चक्रपाणि मॅडम,रत्नमाला रागासे,वैशाली ठाकूर इत्यादी वक्ते उपस्थित होते. याप्रसंगी या सर्वांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये देशात केंद्र शासनामार्फत होत असलेला अन्याय,अत्याचार व वाढता भ्रष्टाचार,देशातील विकत असलेली संपत्ती,वाढती महागाई, कोरोणाच्या नावावर रुग्णांची लूटमार व धर्माच्या नावावर वाढती अराजक्ता संपवण्यासाठी सामाजिक संघटनेने एकत्र येऊन या देशांमध्ये व्यापक स्वरूपात लढाई लढण्याची आवश्यकता आहे असे मार्मिक विचार या प्रसंगी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संतोष खुसपरे, उत्तम गु. बागडे,समीर लाडसे, उत्तमजी रागासे,दादाराव लांजेवार,मनोज बागडे,उमेश मोरे, हितेश बनसोड,रजनीकांत अतकरी,गोपाल धोटे,राजेंद्र नवघरे,सुभाष मछले,सुधाकर तीबोले,राजू खांडे,विक्रम गमे, अनिल घटे,पवन लांबट,रेखाबाई चांदेकर,मदनजी मोरे,मांडवे मॅडम,टापरे मॅडम,भुजाडे मॅडम, बलवीर मॅडम,सुनील गजभिये, सुनील खंडाळकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र सातपुते अध्यक्ष विदर्भ प्रदेश यांनी केले तर आभार संतोष पवार यांनी मानले.