power-theft-in-maharashtra
मराठवाड्यात झाली तब्बल ८३ लाखांची वीज चोरी
power-theft-in-maharashtra
मराठवाड्यात झाली तब्बल ८३ लाखांची वीज चोरी

सिद्धांत
३० डिसेंबर २०२१: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या धडक कारवाईमध्ये जालना, बीड आणि परभणी या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमधून तब्बल ८३ लाखांच्या वीजचोरीची प्रकाराने उघडकीस आली आहेत. महावितरणचे औरंगाबाद विभागाचे अधिकारी सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या धडक कारवाईदरम्यान या तीन जिल्ह्यांमध्ये १४६ ठिकाणी वीजचोरीची प्रकरणे सापडली असून त्यासंबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे.

विद्युत कायदा २००३ नुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था गैरमार्गाने विजेचा वापर करत असल्याचे आढळून आल्यास त्याला वापरलेल्या एकूण वीज आकाराच्या दुप्पट पैसे महावितरण कडे दंड म्हणून जमा करावे लागतात तसेच कायद्याच्या सेक्शन १३५ नुसार त्या व्यक्ती किंवा संस्थांवर पोलीस कारवाईसुद्धा होऊ शकते.
जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील वीजचोरी मध्ये हॉटेल्स, छोटे-मोठे कारखाने, रस्त्यालगतच्या टपऱ्या तर काही ठिकाणी चक्क हॉस्पिटलांचा देखील समावेश आहे.

धोकादायक मार्गानी वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहेच, पण त्याचबरोबर तसे करणे हे प्रचंड धोकादायक असते. लोखंडी हुक थेट विद्युत तारांमध्ये अडकवून वीजप्रवाहाची चोरी केली जाते. तसेच काही ठिकाणी विजेच्या मीटरमध्ये छेडछाड केली जाते. अश्या कृतींमुळे शॉर्टसर्किट सारख्या घटना घडून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते.
वीजचोरी प्रकरणासोबतच वीज बिल थकबाकीची ३२ प्रकरणे या धडक कारवाईदरम्यान आढळून आली असून या महावितरणने थकीत वीज बिलांच्या वसुलीची प्रक्रिया सुरु केली असल्याचे अधिकारी सुनील जाधव वृत्तसंस्थांना सांगितले.

मराठवाडा बनतोय वीजचोरीसाठी कुप्रसिद्ध.
फेब्रुवारी २०२१ मध्ये महावितरणने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून वीजचोरीची तब्बल २९,९५२ प्रकरणे पकडली गेल्याचे उघडकीस आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here