सौ .माधवी ताई नरेश जोशी यांची पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड.
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
कर्जत : – कर्जत, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ.माधवी ताई जोशी या नेहमीच जनहितार्थ विविध उपक्रम राबवत असतात .गोरगरीब जनतेसाठी अन्यायाविरुद्ध लढा देण्यात अग्रेसर भूमिका .समाजकल्याण केवळ हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन समाज सेवेत कार्यरत. दिनांक २१डिसेंबर २०२३रोजी
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. संतोषदादा चौधरी यांच्या आदेशा नुसार मा. श्री. गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांचे सुचनेनुसार मा. श्री. सुनिलभाऊ पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांचे वतीने सौ. माधवीताई नरेश जोशी
यांना पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष
पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे महत्व ओळखून पोलीस व नागरीकांना मदत कराल आणि संघटनेची प्रतीमा जनसमुदाय मध्ये उज्वल करण्याकरिता आणि संघटनेचा जनाधार मजबूत होईल या विश्वासाने माधवी ताई जोशी यांना पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षमा. श्री. संतोषदादा चौधरी यांच्या हस्ते हे पद बहाल करण्यात आले.यावेळी रमेश कदम,नरेश जोशी यांसह अनेक कार्यकारी पदाधिकारी सुध्दा उपस्थित होते व माधवीताईंना या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.