कोणतीही पूर्व सूचना न देता लोणेरे विभागात विजपुरवठा झाला खंडित व्यापारी वर्गाचे झाले लाखो रुपयांचे नुकसान

57
कोणतीही पूर्व सूचना न देता लोणेरे विभागात विजपुरवठा झाला खंडित व्यापारी वर्गाचे झाले लाखो रुपयांचे नुकसान

कोणतीही पूर्व सूचना न देता लोणेरे विभागात विजपुरवठा झाला खंडित

व्यापारी वर्गाचे झाले लाखो रुपयांचे नुकसान

कोणतीही पूर्व सूचना न देता लोणेरे विभागात विजपुरवठा झाला खंडित व्यापारी वर्गाचे झाले लाखो रुपयांचे नुकसान

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगांव : – लोणेरे विभागात दि २९ रोजी वीज पुरवठा महावितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केला होता.
लोणेरे तसेच आजू बाजूच्या गावात अनेक गावे वाडी वस्ती असून वीज पुरवठा खंडित झाल्या मुळे सर्व सामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास झाला.
अशातच लोणेरे गाव हे मुंबई गोवा हायवेवर मुख्य ठिकाण असल्याने त्या ठिकाणी अनेक हॉटेल, स्वीट मार्ट आईस्क्रीम पार्लर,केक शॉप , दूध संकलन केंद्र, मेडिकल. दवाखाने तसेच इतर छोटी मोठी दुकानें मोठया प्रमाणात असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने ह्या सर्वांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी मोठया चिंतेत आहेत त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सौ. डॉ. स्विटी गिरासे यांच्या प्रमुख उपस्थित महावितरण कंपनी सब डिव्हीजण गोरेगाव अभियंता जगताप साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी उद्योजक निलेश केसरकर,रोहित रातवडकर,शंकर रायका, संजय म्हसकर गोरेगावं ग्रामपंचायत सदस्या संगीता महाडिक, पल्लवी शहा,धनश्री म्हशेलकर, अक्षय कदम, बजरंग दलाचे विशाल भुस्कुटे,आनंद राजभर, नितेश बामणोलकर,विराज यादव, मानवअधिकार लोणेरे विभागीय सचिव-खाडे सर,महेश तळवटकर, पत्रकार पांडुरंग माने तसेच व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच निवेदनात असेही सांगण्यात आले की या पुढे जर कोणाला पूर्व कल्पना न देता वीज पुरवठा खंडित झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल व आपल्या वीज कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा का खंडित झाला अथवा तो कधी पूर्ववत होईल असे व्यापारी वर्ग व नागरिकांनी दूरध्वनी वरून विचारल असता त्यांच्या कडून उद्धट पणे तसेच असमाधानकारक उत्तरे देण्यात आली त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकारी यांनी त्यानां समज द्यावी असेही उपस्थित कार्यकर्त्यान मार्फत सांगण्यात आले