*कुणबी विभागीय शाखा विरारचा दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन सोहळा
भाग्यलक्ष्मी लकी ड्रॉ सोडत योजनेचा शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न*
दिपक मांडवकर
विरार मुंबई प्रतिनिधी
विरार : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई , विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी युवा विरार , कुणबी महिला मंडळ,विरार आयोजित सन २०२५ चा दिनदर्शिका सोहळा आज दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी ज्युपिटर स्कूल, मनवेल पाडा गाव, विरार पूर्व येथे कुणबी बँकेचे संचालक मा. श्री पी. डी. ठोंबरे यांच्या मुख्य उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बहुसंख्येने उपस्थित कुणबी समाज बांधव, भगिनी ,युवक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. त्याच बरोबर विभागीय शाखा विरार च्या माध्यमातून भाग्यशाली लकी ड्रॉ सोडत योजनेचा शुभारंभ देखील या कार्यक्रमात करण्यात आला. ही लकी ड्रॉ योजना शाखेच्या पुढील वर्षाच्या विविध उप्रकमांसाठी निधी संकलन करण्यासाठी राबवण्यात येणार आहे. या मध्ये सोन्याची, चांदीची नाणी, सोन्याच्या इतर वस्तू तसेच गृहोपयोगी विविध ५५ वस्तू बक्षीस स्वरूपात ठेवण्यात आलेली आहेत. ही सोडत २३ फेब्रुवारी २०२५ रोजी विभागीय शाखेच्या वर्धापन दिन सोहळ्यावेळी भव्य अशा कार्यक्रमात हजारो बांधवांच्या साक्षीने काढण्यात येईल अशी माहिती शाखेकडून सर्वांना देण्यात आली. तसेच या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा व शाखेला उपकृत करावे असे आवाहन विभागीय शाखा विरार कडून करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन कुणबी बँक संचालक श्री. पी. डी. ठोंबरे साहेब.ऍडव्होकेट शिंदे साहेब,समाजसेविका सौ. पालांडे ताई, ज्योतीताई कडू,तनिष्खा महिला बचत गटाच्या पदाधिकारी सौ. पडवळ ताई,डॅशिंग पत्रकार श्री. दीपकजी मांडवकर, संजीवनी हॉस्पिटलचे अधिकारी श्री. तुकाराम पष्टे, रुग्णसेवक श्री. संदीपजी खैर साहेब, खेडचे समाजसेवक गुरुजी श्री. कुळये साहेब, गुहागर कुणबी युवा अध्यक्ष श्री. सुनीलजी ठोंबरे साहेब. मनवेल पाडा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी श्री. गणेशजी सुर्वे, जनसेवक, विक्रमजी चाळके साहेब,श्री. परशुरामजी नाईक साहेब,एकता नगरचे जनसेवक आयु,अशोकजी कदम साहेब,कोकण नगरचे अध्यक्ष श्री, विनायकजी शिगवण साहेब,कुणबी उद्योजक श्री. अनंतजी फिलसे साहेब, कोकण नगर राहिवाशी संघ खालील विभाग ०२ चे अध्यक्ष श्रीमान महेशजी साळुंखे साहेब, चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे समाज सेवक श्री. नावले साहेब,शिव स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विलासजी सुवरे साहेब,गुहागर तालुक्यातील समाजसेवक श्री. दिलीपजी निवाते साहेब,मनवेल पाडा सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते,गावडे साहेब, महाडिक साहेब,गुहागर कुणबी युवा चे खजिनदार, संतोषजी फटकरे, आणि सर्व सहकारी बंधू,
या कार्यक्रमाला विभागीय शाखा अध्यक्ष श्री किशोर भेरे सर, महिला मंडळ अध्यक्षा तथा कार्यसम्राज्ञी माजी नगरसेविका सौ. संगीता ताई भेरे मॅडम, विरार युवाध्यक्ष श्री अविनाश पाचकले सर, शाखा सरचिटणीस श्री एकनाथ डिंगणकर सर, युवा सचिव श्री सुरेश मोहिते सर, खजिनदार श्री शैलेश बामणे सर , मार्गदर्शक श्री. अनिलजी अवेरे.श्री अरुण ठोंबरे सर, उपाध्यक्ष श्री सुनील ह. रेवाळे सर, श्री नितीन ठोंबरे सर,श्री दिलीप रहाटवळ सर, श्री दिनेश रहाटवळ सर, श्री सुनील दे. रेवाळे सर, श्री सदाशिव गोणबरे सर, श्री.शैलेश दळवी,कु,शैलेश बालगुडे श्री.यशवंत भाणसे श्री. दिनेशजी उदेग साहेब,श्री. गणपत सोडये,उपस्थित होते.
महिला मंडळाच्या पदाधिकारी सौ.
सोनीली रेवाळे, सौ. स्वप्नाली रेवाळे, सौ, सलोनी किडबीडे, सौ, तनस्वी बामणे, तनिष्का महिला मंडळ, एकता महिला मंडळ विरार,
वरील शाखेच्या पुरुष वर्ग महिला वर्गाच्या अथक परिश्रमाणे दीनदर्षिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री,एकनाथ डींगणकर सर यांनी आपल्या सुमधुर आवाजात केले. उपस्थित सर्वांचे आभार मानून सर्वांना दिनदर्शिका वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.