काबूल/इस्लामाबाद –काबूलमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या नात्यात अधिक तणाव निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानच्या न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार काबूल हल्ल्यांनंतर दुःख व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राअध्यक्ष प्रेसिडेंट अशरफ गनी यांना फोन केला होता. पण नाराज गनी यांनी फोनवर बोलण्यासही नकार दिला. काबूलच्या दोन हल्ल्यांमध्ये 143 जणांनी प्राण गमावले आहेत. अफगाणिस्तानने दावा केला की, हे हल्ले पाकिस्तानच्या लष्कराने घडवले आणि त्याचे पुरावेही त्यांनी पाकिस्तानला पाठवले आहेत.

पाकच्या कृत्याने नाराज
– अशरफ गनी यांनी पाकच्या पंतप्रधानांशी फोनवर बोलण्यास नकार दिल्याचे वृत्त अफगाणिस्तानची न्यूज एजन्सी टोलोने दिले आहे.
– वृत्तानुसार पाकचे पंतप्रधान अब्बासी यांनी गनी यांना काबूल हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी फोन केला होता. प्रोटोकॉलनुसार अब्बासी यांनी फोन करण्यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात एक मॅसेज पाठवला.
– गनी यांना हा मॅसेज मिळताच त्यांनी स्पष्ट शब्दांत अब्बासी यांच्याशी बोलण्यास नकार दिला. जागतिक नेते अशी प्रतिक्रिया शक्यतो देत नाही. पण गनी यांच्या पावलामुळे ते पाकिस्तानवर किती नाराज असतील याचा अंदाज येतो.

पाकिस्तानला पुरावेही पाठवले
– न्यूज एजन्सीनुसार अफगाणिस्तानच्या तपास संस्थांना दोन्ही हल्ल्यांत पाकिस्तान आर्मी आणि ISI चा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
– अफगाणिस्तान सरकारने एक स्पेशल डेलिगेशन पाकिस्तानला पाठवले आहे. ते शिष्टमंडळ पुरावे घेऊन इस्लामाबादेच पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here