राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी होणार चंद्रपूरात

61
राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी होणार चंद्रपूरात

राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी होणार चंद्रपूरात

राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी होणार चंद्रपूरात

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

मुंबई : 31 जानेवारी
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी २० फेब्रुवारी पासून चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह व प्रभा सभागृह वन अकादमी येथे आयोजित होणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 
यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील राज्यातील १९ केंद्र व गोवा अशी २० केंद्रांवरील प्राथमिक फेरीत ३८१ नाट्यसंस्थांनी नाटकांचे सादरीकरण केले. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत निवड झालेल्या नाटकांची अंतिम फेरी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या सर्व संस्था, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.