फेसबुक ग्रुप ‘पराकर्मी योद्धा महार’वर गुन्हा दाखल करा
हिंदु जागरण संघ घुग्घुसची मागणी
🖋️ साहिल सैय्यद
📲 9307948197📲
घुग्घुस :येथील हिंदु जागरण संघातर्फे समाज माध्यमाच्या फेसबुक ग्रुप ‘पराकर्मी योद्धा महार’ वरून पोस्ट टाकण्यात आली त्यामध्ये हिंदु देवी देवताचे अश्लील चित्र आणि अभद्र टीका करणारे प्रकाश रामटेके (रा. भद्रावती) यांच्यावर गुन्हा दाखल करून फेसबुक ग्रुप व एडमिन वर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा अशी मागणी ठाणेदार आसिफराजा शेख यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
फेसबुक ग्रुप ‘पराकर्मी योद्धा महार’ पासून वायरल झालेली पोस्टमध्ये हिंदु देवी देवताचे अश्लील चित्र पाठविण्यात आले. त्यावर अभद्र टीका करण्याचे कार्य प्रकाश रामटेके (रा. भद्रावती) यांच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे घुग्घुस परिसरातील समस्त हिंदु बांधवांची भावना दुखावल्या आहे. परिसरातील शांतिमय वातावरण खराब करण्याचे कार्य केल्या गेले.
या कृत्याला लक्षात घेत कारवाई करून गुन्हा दाखल करावा आणि समाज माध्यमाचे फेसबुक ग्रुप ‘पराकर्मी योद्धा महार’ असे ग्रुप चालवीणाऱ्यांना शिक्षा देऊन बंद बंद करावे.
यावेळी हिंदु जागरण संघ घुग्घुसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.