ग्रामगीता महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली .

64

अमान क़ुरैशी
सिंदेवाही प्रतिनिधि
8275553131

चिमूर :- दिनांक 30 जानेवारी रोज मंगळवार ला, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त हुतात्मा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमाणी सर यांच्या अध्क्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संदीप सातव सर, प्रा. हुमेश्र्वर आंनंदे सर,प्रा. संदीप मेश्राम सर उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अमीर धमाणी सर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले, सत्य व अहिंसा या दोन गोष्टीचा आपल्या आचरणात उपयोग केला पाहिजे, याचे महत्त्व समजावून सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज बोधे सरांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. निलेश ठवकर सर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.