राष्ट्र उभारणीसाठी महात्मा गांधीच्या विचारांची नितांत गरज -डॉ. वैभव म्हस्के

राष्ट्र उभारणीसाठी महात्मा गांधीच्या विचारांची नितांत गरज -डॉ. वैभव म्हस्के

राष्ट्र उभारणीसाठी महात्मा गांधीच्या विचारांची नितांत गरज -डॉ. वैभव म्हस्के

देवेंद्र भगत
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920

अमरावती (31.01.2024)-
राष्ट्रपीता महात्मा गांधीनी स्वातंत्र संग्रामात इंग्रजांना पळवून लावण्यासाठी हिंसक व आक्रमक पध्दतीचा अवलंब न करता त्यांनी सत्य आणि अहिंसा या मार्गाचा स्वीकार करुन त्यांच्या कार्यशैलीची प्रतिमा समाजामध्येच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रामध्ये उमटलेली दिसून येते. अशा अहिंसेच्या मार्गातून राष्ट्रीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी भविष्यातही महात्मा गांधीच्या विचारांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. वैभव म्हस्के यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एम.ए. समुपदेशन व मानसोपचार या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त्य महात्मा गांधी : काल, आज आणि उद्या या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इन्नानी महाविद्यालय कारंजा लाड येथील माजी प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. आर. राजपूत, डॉ. श्रीकांत पाटील यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु. प्रियंका तायडे, आभार कु. शीतल सोळंके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.मंजूषा बारबुध्दे, प्रा. अर्चना ढोरे, प्रा. नेहा उमरे, प्रा. भावना गव्हाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here