नेरळ पाडा येथे मिनी ट्रेन मार्गावरील फाटकात नव्याने डांबरीकरण झाले.
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
नेरळ;:-नेरळ माथेरान मिनीट्रेनचे मार्गावर नेरळ गावातील पाडा येथे असलेले फाटक मधील रस्ता मागील काही महिने नादुरुस्त झाला होता. त्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अभियंता सूर्यकांत चंचे यांनी सातत्याने रेल्वे, नेरळ ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, 30 जानेवारीचे रात्री रेल्वे कडून त्या ठिकाणी नव्याने डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत बनविण्यात आला आहे.
नेरळ गावातील नेरळ माथेरान नेरळ असा मिनी ट्रेनचा मार्ग आहे.या मार्गावर नेरळ गावातील पाडा येथे फाटक असून तेथून माथेरान नेरळ कळंब राज्य मार्ग रस्ता जातो.1 907 मध्ये मिनी ट्रेन सुरु झाल्यापासून आजातगत ते फाटक वाहनांना जाण्यासाठी वापरात आहे. नेरळ माथेरान अशी मिनी ट्रेनची सेवा जेमतेम असते आणि त्यामुळे ट्रेन जाण्याच्या अपवाद वगळता हे फाटक वाहनांसाठी खुले असते.मागील वर्षभर नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावर नव्याने रुळ बदलण्याची कामे सुरू आहेत.त्यात पूर्वीच्या तुलनेत आता सर्व ठिकाणी रुळ काढून ते जमिनीच्या पातळीवर घेण्यात आले आहेत.त्यामुळे आपोआप त्याचा फटका माथेरान नेरळ कळंब मार्गावरील फाटक असलेल्या ठिकाणी जुन्या रस्त्याच्या मर्गिकेपासून मिनी ट्रेन ची मार्गिका ही उंच झाली.त्यामुळे गेली काही महिने वाहन चालक यांच्यासाठी ते फाटक कसोटी पाहणारे ठरत होते.त्यात दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक यांना त्या ठिकाणी बनलेले खड्डे परीक्षा पाहणारे होते.अनेक दुचाकी चालक हे तेथे झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनावरील खाली देखील कोसळले आहेत.
त्यामुळे पेशाने अभियंते असलेले पाडा गावातील रहिवाशी सूर्यकांत चंचे यांनी नेरळ ग्रामपंचायत कडे रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली.नेरळ ग्रामपंचायतने तेथे खड्डे भरण्याचे काम ऑक्टोबर महिन्यात केले.त्यानंतर काही दिवसात तेथे पुन्हा खड्डे पडले असता सूर्यकांत चंचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्डे भरण्याची मागणी केली.मात्र संबंधित फाटक हे रेल्वेचे हद्दीत असल्याने रेल्वे कडे चंचे यांच्याकडून पाठपुरावा सुरू झाला.मध्य रेल्वेचे कार्मिक अधिकारी कांबळे यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. कार्मिक विभागाकडून तेथील शाखा अभियंता सुशील सोनावणे यांना मिनी ट्रेन फाटक परिसरात डांबरीकरण करण्याचे आदर्श दिले होते.त्यानंतर 30 जानेवारीच्या रात्री पी डब्लु आय विभागाने रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ कमी झाल्यावर डांबरीकरण करून घेतले,त्यावेळी रेल्वेचे सानप तसेच सूर्यकांत चंचे यांनी रस्त्यावर उभे राहून डांबरीकरण दर्जा चांगला ठेवण्यावर भर दिला.तसेच त्या कालावधीत कोणत्याही वाहनांना तेथून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने चांगले डांबरीकरण आणि फटकाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक टाकून घेण्यात आले आहेत.त्या फटकामध्ये रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने ग्रामस्थ आणि वाहन चालक यांनी समाधान व्यक्त केले असून पाडा येथील सिद्धिविनायक मित्र मंडळ आणि राज बाग सोसायटीचे अध्यक्ष भगवान चंचे यांनी रेल्वे प्रशासन आणि निवृत्त अभियंता सूर्यकांत चंचे यांचे अभिनंदन केले आहे.