राजिप. प्राथमिक शाळा सुतारपाडा येथे संगणक वाटप.

62

राजिप. प्राथमिक शाळा सुतारपाडा येथे संगणक वाटप.

राजिप. प्राथमिक शाळा सुतारपाडा येथे संगणक वाटप.

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन यांचा स्तुत्य उपक्रम

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-दुर्गम भागातील आदिवासीवाडी तसेच सर्वसामान्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना देखील बदलत्या काळानुसार संगणक प्रणालीद्वारे शिक्षण घेता यावे या उद्देशाने त्यांची गरज ओळखून उज्ज्वला चंदनशिव यांच्या उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्या संकल्पनेतून सुतारपाडा येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना संगणक वाटप करण्याचे ठरले यावेळी ही संकल्पना त्यांनी जिविता पाटील यांच्या तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबाग रायगड यांना सांगितली. दरम्यान संगणक वाटप करण्यासाठी लागणारा निधी उज्ज्वला चंदनशिव यांच्या प्रयत्नातून शिंदे हॉस्पिटल नवेनगर येथील डॉ.धनंजय शिंदे, राजेश सोनी(प्रिन्स ज्वेलर्स )कैलास सोनी( सोनी ज्वेलर्स )अलिबाग , माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, मंजुश्री शंकर शिंदे, एपीआय. योगेश रामेकर, सामाजिक कार्यकर्ते सहीम रशीद, अमोल काटकर (कोल्हापूर )यांनी सामाजिक घटकांसाठी आपले कर्तव्य व दातृत्त्व लक्षात ठेवून या दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणि त्यांनी केलेल्या अनमोल सहकार्यातून सदरील संगणक खरेदी केले व त्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या संस्थापिका उज्ज्वला चंदनशिव, तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन संस्थापिका ॲड. जिविता पाटील, तेजस्विनी फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. विकास पाटील, शिंदे हॉस्पिटल नवेनगर येथील डॉ.धनंजय शिंदे यांच्या उपस्थितीत राजिप. प्राथमिक शाळा सुतारपाडा येथील मुख्याध्यापिका वेदांती वैभव पाटील तसेच सहाय्यक शिक्षिका अनिता गावंड यांच्याकडे सदरील संगणक सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेतील ४८ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी सदरील संगणकाचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांच्या शिक्षिकांनी सांगितले व दिलेल्या शब्दाचे पालन करीत शाळेला संगणक दिल्याबद्दल मुख्याध्यापिका वेदांती वैभव पाटील यांनी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन संस्थापिका ॲड. जिविता पाटील यांचे आभार व्यक्त केले.