लॉकडाऊनच्या काळात खाजगी शाळांनी विध्यार्थाना परीक्षा पासुन वंचीत ठेवण्यात येवु.
सावनेर गटशिक्षण अधीका-यांना संभाजी निवेदन.
✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर,दि.31 मार्च:- गेल्या एक वर्षा पेक्षा जास्त कालावधीपासुन जागतीक महामारी कोरोनाच्या नावाखाली केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने देशात लॉकडाऊन लावले. त्यामुळे सर्व शाळा पुर्णत बंद करण्यात आल्या. ऑनलाइन शिक्षणाच्या नावावर खाजगी कॉन्व्हेट, स्कूल आणि कॉलेज मनमानी करुन फीस वसूल करीत आहे. आम जनतेला धमकवल्या जात आहे. लॉकडाऊन मुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे. अनेकाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यात खाजगी शाळा संचालक फी भरल्या शिवाय परीक्षेला बसु देणार नाही असा हुकुम देत असल्याने अनेक पालकांचा काळजाचे ठोके वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास फी न भरल्यामुळे व्हाट्स अपच्या ग्रुप मधुन माघिल सहा महीन्यापासुन काढले. अशा परीस्थीतीत फी कशाची भरावी हा प्रश्न अनेक पालक विचारत आहे?
विद्यार्थ्यांना परीक्षा पासुन वंचीत ठेवता येत नाही, असा शासनाचा आदेश असताना खाजगी शाळेचे संचालक, मुख्याध्यापक मुलांना परीक्षा पासुन वंचीत ठेवण्याचा विचार करीत आहे. त्या शाळा संचालकांना नोटीस पाठवुन सर्व विध्यार्थाना परीक्षेला बसु द्यावे अन्यथा या शाळा विरोधात विध्यार्थी व पालकांना सोबत घेवुन व्यापक आंदोलन छेडण्यात येईल. या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे नागपुर विभागीय अध्यक्ष दिनेश भाऊ इंगोले, जनकल्यान सामाजीक संस्था अध्यक्ष भगवानजी चांदेकर, संभाजी ब्रिगेड सावनेर तालुका अध्यक्ष पवन लांबट, पत्रकार युवराजी मेश्राम यांच्या वतीने पंचायत समिती सावनेर गट शिक्षणाधीकारी भाकरे साहेब यांना देण्यात आले.