यवतमाळ जिल्हात गरिबांना राशन मध्ये दिला जात आहे निकृष्ट दर्जाचा मका.

54

यवतमाळ जिल्हात गरिबांना राशन मध्ये दिला जात आहे निकृष्ट दर्जाचा मका.

यवतमाळ जिल्हात गरिबांना राशन मध्ये दिला जात आहे निकृष्ट दर्जाचा मका.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ,दि.31 मार्च:- यवतमाळ जिल्हातील अनेक तालुक्यातील गावात शासनाच्या स्वस्त धान्याच्या नावावर निकृष्ट दर्जाचे राशन देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

माघिल अनेक वर्षा पासून शासन गरिब परिवारासाठी स्वस्त धान्याचे वाटप करत आहे. आणि अनेक वर्षापासुन तो सुरळीत पणे सुरू होता. आता शासनाने गरिबाचा आहारात प्रमुख असलेले गहू कमी करुन त्याजागी प्रशासना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमाने गव्हाच्या जागेवर निकृष्ट दर्जाचा मका देऊन गरिबांची थट्टा सुरु केली आहे.

धान्य रूपाने मीळणा-या गव्हाऐवजी निकृष्ट दर्जाचा मका प्रत्येक परीवाराला देण्यात येत आहे. या मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, सोंडे, भरडलेला, काळपट जो जनावरेही खाणार नाही असा प्रमाणात आहे.