लोहिया विद्यालयात संत तुकाराम बीज व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.
लोहिया विद्यालयात संत तुकाराम बीज व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.

लोहिया विद्यालयात संत तुकाराम बीज व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.

लोहिया विद्यालयात संत तुकाराम बीज व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.

गोपालजी अग्रवाल✒
सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी
सौंदड,दि 31 मार्च:- येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौन्दड येथे संत तुकाराम बीज व विद्यालयातील कार्यरत वरिष्ठ लिपीक श्री मधुकर गोपीनाथ झोडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम आज दि. 30 मार्च 2021 ला मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया,-संस्थापक-संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांचे शुभहस्ते लोहिया शिक्षण संस्थेतर्फे भेटस्वरूप भगवान गणेशजीची मूर्ती, शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला तसेच विद्यालकडून जगदीश लोहिया, संस्थापक-संस्थाध्यक्ष, पंकज लोहिया-संस्था सदस्य, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, मुख्याध्यापक मनोज शिंदे, रामभाऊ झोडे-संस्था सदस्य यांच्या शुभहस्ते भगवान राधाकृष्ण यांची मूर्ती भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. अनिल मेश्राम सर यांनी सुद्धा पुस्तक स्वरूपात भेट दिली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहीया, संस्थापक- संस्थाध्यक्ष यांनी तुकाराम बीज निमित्त तुकाराम महाराजांच्या जीवनावर विस्तृत माहिती दिली तसेच वरिष्ठ लिपिक मधुकर झोडे यांची संपूर्ण सेवाकाळात संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल गुणग़ौरव केला. यावेळी मा.मधुसूदन दोनोडे, स.शि.श्री.टी. बी.सातकर, डी.एस.टेम्भूरने, आर.आर.मोहतुरे, शारीरिक शिक्षिका कु. यु.आर. बाच्छल, स.शि.श्री.जी.एस.कावळे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, अनिल मेश्राम सर, रामभाऊ झोडे यांनी आपल्या भाषणातुन संत तुकाराम बीज याविषयी माहिती दिली व मधुकर झोडे यांच्याविषयी माहिती दिली, गौरवोद्गार काढून त्यांच्या भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाला डॉ. संकेत परशुरामकर, परेश लोहिया-संस्था सदस्य, थेर सर, अनिल दिक्षित, शमीम शैय्यद, पठाण साहेब, प्रल्हाद कोरे, भजनदास बडोले, नलीराम चांदेवार, महादेव लाडे, कटनकर साहेब, प्रभुजी इटवले, दामोदर मेश्राम, पुरुषोत्तम लांजेवार, वसंता विठ्ठले, हरणे सर तसेच संस्थेशी संबंधित सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण, निमंत्रित पाहुणे, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स.शि. कु.यू. बी.डोये यांनी केले तर आभार स.शि.श्री.डी.ए. दरवडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या अभंगाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here