मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला मिंडाळा येथील महिला रुग्णाला आर्थिक मदतीचा हात
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड- तालुक्यातील मौजा- मिंडाळा येथील रंजना गजानन आंबोरकर यांना काही दिवसांपासून किडनी स्टोनचा त्रास होता जास्त त्रास होत असल्याने रुग्णाचे कुटूंबियांनी किडनी स्टोनचा ऑपरेशन करण्याचे ठरवले व नागरे हॉस्पिटल ब्रम्हपुरी येथे रुग्णाला भरती केले परंतु परिस्थिती अभावी मोठा खर्च करणे शक्य नव्हते त्यामुळे रुग्णाचे कुटुंबीयांनी ऑपरेशन करिता जास्त खर्च लागत असल्याने गावातील भाजपा पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून सदर आर्थिक मदतीचा अर्ज भाजपा जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे दिला असता कर्तव्यदक्ष,गरिबांचे कैवारी,मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब यांनी कसलाही विलंब न करता तात्काळ मा.संतोष भाऊ रडके तालुकाध्यक्ष नागभीड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी सोबत रुग्णाला आर्थिक मदत देण्यात आली.
रुग्णाला आर्थिक मदत देतांना,
संतोष रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,अरविंद भुते जिल्हा परिषद प्रमुख कांपा मौशी तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.