” मौजा शहापूर येथे नानाजी जोशी महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न “
” पुस्तकी ज्ञानासह अभ्यासाची ही अत्यंत गरज : न्यायाधीश अंजू शेंडे
✍ भवन लिल्हारे ✍
!! भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी !!
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मौजा शहापूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत नानाजी जोशी महाविद्यालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आज दिनांक ३० मार्च रोजी घेण्यात आले. या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहणारे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. अंजू शेंडे यांनी आपल्या भाषणात ज्ञान म्हणजे नेमकं काय? आणि पुस्तकी ज्ञानासह अभ्यासाची गरज कां आहे.या विषयावर मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक व्यक्तीमत्व असते. सुप्त गुण असते. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडविण्यासाठी तसेच त्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नाही. तर त्यासाठी त्यांना अनेक व्यक्तीमत्व अभ्यासणे सुद्धा महत्वाचे आहे, प्रत्येक विद्यार्थाला प्रत्येक विषय आवडतोच अशा नाही. परंतु त्या विषयावर प्राविण्य मिळवायचा असेल तर त्या विषयावर नियमीत अभ्यास तसेच सराव करणे गरजेचे आहे विद्यार्थांनी माणसिक ताणतणाव घेऊ नये. एकमेकांना नेहमी सहकार्य करावे. एखादा विद्यार्थी अशा अडचणीत असेल तर शिक्षकांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करावे. व त्यांच्या आवडी नुसार त्यांची रुची कशात आहे. हे विचारूण त्यांना त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्यास होकार भरावे, जेनेकरूण त्या मुलांना शाळेत क्रिकेट,कुस्ती, कबड्डी, खोखो, बॅटबिंटन, कराटे, रिले, अशा विविध खेळांमध्ये रुची दाखविली असल्यास त्यांना त्याच खेळाच्या माध्यमातुन भविष्य कसा बनवता येईल त्याच्यावर मार्गदर्शन करणे गरजेचे असते. व त्याला सकारात्मक विचाराने त्याचा समाधान करने गरजेचे असते.
तसेच त्यांनी विधी सेवा प्राधिकरण गरजुंना मदत करण्यास नेहमी तत्पर आहे. कोणत्याही व्यक्तीला मोफत विधी सेवेची गरज भासल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा या कार्यालयाला संपर्क साधावे. असे आव्हाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.
त्यावेळेस या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मा. न्या. अनिता शर्मा, न्या. जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे, न्या. सी.एल.देशपांडे, न्या. प्रकाश बी. तिजारे, न्या. एस.एस. शिंदे, न्या. एम.ए.कोठारी, न्या. ए.के. आवारी, न्या. आर.एस. भोसले, न्या. पी.पी. देशमुख, न्या. आर. पी. थोरे, न्या. पी.ए. पटले, न्या. सी. वाय. नेवारे , न्या. एस.आर. जैन, जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आर. बी. वाढई, जिल्हा अधिवक्ता संघातील इतर सदस्य शिक्षक समन्वय समिती संयोजक पालांदूरकर, प्राचार्य अरुण कोकवार, प्राध्यापक व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य अरुण कोकवार यांनी केले. संचालन प्रा. पितांबर उरकुडे यांनी केले. आभार प्रा. विनोद भोंगाडे यांनी मानले.