राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सामाजिक न्याय विभागाची विदर्भस्तरीय आढावा बैठक संपन्न
मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593
*गडचिरोली* :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची विदर्भस्तरीय आढावा बैठक दिनांक २७ मार्च ला रवी भवन नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीला विदर्भातील १२ जिल्ह्याने सहभाग नोंदवला होता या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख मा.आ.जयदेवजी गायकवाड साहेब तसेच प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे साहेब यांनी मार्गदर्शन केले विदर्भस्तरीय बैठकीत गडचिरोली सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्या कार्यकारिणी चा आढावा मा.आ.जयदेवजी गायकवाड तसेच प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या कडे कार्यकारिणी चा अहवाल जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम यांनी सादर केला.
सदर विदर्भस्तरीय आढावा बैठकीत सामाजिक विभागाचे संघटन बांधताना कोण कोणत्या अडचणी चा सामना करावा लागतो तसेच जिल्ह्यातील समस्या काय आहेत हे सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपस्थित सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव बुद्धघोष मेश्राम,महिला जिल्हा अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके,जिल्हा उपाध्यक्ष शैला कातकर,जिल्हा सरचिटणीस सविता चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मनोरामा गराडे, तालुका अध्यक्ष आशिष गेडाम,यावेळी उपस्थित होते.