!! द् मनू फाईल्स !!

!! द् मनू फाईल्स !!

!! द् मनू फाईल्स !!

✍ भवन लिल्हारे ✍
!! भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी !!
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

मनूची फाईल्स
सांगत होती
स्पर्श करू नका
दूर राहा
गावाबाहेर राहा
वर्ण पाळा
धर्माचे गुलाम व्हा
शिकू नका शाळा
जनावर बना
वेदना होतील सहन करा
स्त्रीयांना दासी करा
निर्बंध लावा
पशू आणि माणूस
फरक काय?
शृंखलाबद्ध जीवन
साक्षात नरक हाय!
पाणवठा वेगळा
मसणवठा वेगळा
कंबरेला झाडू
मनूची शाळा
हिटलर, मुसोलिनी,मॅझिनी भक्त
मनूच्या रुपाने सांडवितो रक्त
मनू द्वेषाचे नाव
मनूचे खैरलांजी,उन्नाव,कोपर्डी,सोनई,हाथरस गाव
मनू विषमतेचा कायदा
वेदाने केले भेद
यात मनूचा फायदा
मनू मरत नाही
मनू जगू देत नाही
तो प्रत्येक गावात भेटतो
तो प्रत्येक चौकात दिसतो
तो धमकी देतो
मनू काश्मीर ते कन्याकुमारी राज करतो
मनू साम,दाम,दंड,भेद मानतो
मुक्त करा मला
माणूस करा मला
माझा देश कुठे आहे?
मला हवी समता
मला हवे संविधान
मला हवी शांती
मला हवा बंधुभाव
मी महाडचे चवदार तळे आहे
मी पुणे करार आहे
मी संविधान आहे
मी मिलिंद आहे
मी नागसेन आहे
मी धम्मप्रिय आहे
माझा विश्वास
साक्षर भारत
माझा विश्वास
अंधश्रद्धामुक्त भारत
माझा विश्वास
समता भारत
माझा विश्वास
बंधुता भारत
माझा विश्वास
धर्मनिरपेक्षता भारत
माझा विश्वास
न्याय………….?