जनसामान्यांना प्रकाश देणारा दिवा म्हणजे दिपक सोनापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवीत विरोधकांना दिली जबर धडक येणाऱ्या काळात सोनापूर देशपांडे प्रमाणे वेडगाव,जुना पोडसा,सकमुर ग्रां.पं.वर एकहाती भाजपची सत्ता बसविणे हे उद्दिष्ट दिपक सातपुते

जनसामान्यांना प्रकाश देणारा दिवा म्हणजे दिपक

सोनापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवीत विरोधकांना दिली जबर धडक

येणाऱ्या काळात सोनापूर देशपांडे प्रमाणे वेडगाव,जुना पोडसा,सकमुर ग्रां.पं.वर एकहाती भाजपची सत्ता बसविणे हे उद्दिष्ट दिपक सातपुते

जनसामान्यांना प्रकाश देणारा दिवा म्हणजे दिपक सोनापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवीत विरोधकांना दिली जबर धडक येणाऱ्या काळात सोनापूर देशपांडे प्रमाणे वेडगाव,जुना पोडसा,सकमुर ग्रां.पं.वर एकहाती भाजपची सत्ता बसविणे हे उद्दिष्ट दिपक सातपुते

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी : – गोंडपीपरी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि वेडगाव,सोनापूर,जुना पोडसा अशा तीन गावाचा समावेश असणाऱ्या सोनापूर सेवा सहकारी सोसायटी निवडणूक संपन्न झाली असून भाजपचे माजी पं.स.सभापती दिपक सातपुते यांच्या नेतृत्वात विरोधकांचा खळबळजनक पराभव करीत १३ पैकी १३ उमेदवारांनी विजय मिळवला आहे.अतिशय रंगतदार झालेल्या निवडणुकीत माजी सभापती दिपक सातपुते यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर मातब्बर विरोधकांवर मात केली आहे.यामुळे तालुक्यातील अनेक राजकीय मंडळींचे धाबे दणाणले असून जनसामान्यांना प्रकाश देणारा दिवा म्हणजे दिपक अशी ओळख निर्माण केली आहे.विजयी उमेदवारांमध्ये बाबुराव बोंमकंठीवार, गुरुदास झाडे,धनंजय चौधरी,मोहन चौधरी,शंकर चौधरी,महादेव चौधरी, तानुबाई ठाकूर,विनोद वाघाडे,नंदाताई येलमुले,आत्माराम धुडसे,कालिदास घ्यार,भैय्याजी कुरवटकार यांचा समावेश आहे.विजयी उमेदवाराना निवडून आणण्यासाठी भारत घ्यार,लक्ष्मण येलमुले,सुरेंद्र रायपुरे,विठ्ठल बोरकुटे सहित सोनापूर देशपांडे,वेडगाव,जुना पोडसा येथील अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.