दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर तेजस्वी सुर्या आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्याचा चंद्रपूर आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथे निदर्शने करून जाहिर निषेध केला .

दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर तेजस्वी सुर्या आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्याचा चंद्रपूर आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथे निदर्शने करून जाहिर निषेध केला .

दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर तेजस्वी सुर्या आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्याचा चंद्रपूर आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथे निदर्शने करून जाहिर निषेध केला .

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045

दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर काल जो तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, सिक्युरिटी बॅरियर तोडले, मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दरवाज्यावर रंग फासले. हे सर्व होत असताना दिल्ली पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत राहिले. जिथे इतर मुख्यमंत्र्यांच्या घराच्या आसपास लोकांना फिरकू देखील दिले जात नसताना, दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर भाजपच्या गुंडांच्या एका मोठ्या समूहाला अशा पद्धतीने राडा घालू देणे, हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग आहे.

आज स्थानिक चंद्रपूर येथील गांधी चौकात आप चंद्रपुर च्या वतीने निदर्शने करण्यात आली, सदर घटने चा तिव्र निषेध करण्यात आला.
*आपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे तथा समस्त आम आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा तर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

केवळ दहा वर्षांमध्ये आम आदमी पक्षाने दिल्लीपाठोपाठ पंजाब मध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवल्याने, भारतीय जनता पक्ष प्रचंड विचलित झाला आहे. दिल्ली महानगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभवाची काळजी वाटत असून केंद्र सरकारने एक कायदा आणून दिल्ली महानगरपालिकांच्या नियोजित निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. *काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे. भाजप गेली अनेक दशके काश्मीरी पंडितांचे राजकारण करत असून प्रत्यक्षात 13 वर्षे केंद्रात सत्ता असून देखील भाजपने काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी हितासाठी काहीच केले नाही. त्यामुळे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे पोस्टर लावून आपण काश्मिरी पंडितांसाठी काहीतरी करत असल्याचा आव भाजपा आणत आहे, ही बाब दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील लोकांच्या नजरेसमोर आणली.*

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार स्थलांतरित काश्मीर पंडित कंत्राटी शिक्षकांना नियमित करून त्यांना स्थायी रोजगार देऊ बघत असताना लेफ्टनंट गव्हर्नर यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने काश्मिरी पंडित शिक्षकांच्या हिताविरोधामध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये आडकाठी आणली हे आता सप्रमाण आम आदमी पक्षाने काल सिद्ध केले आहे. *दिल्लीतील सरकार काश्मीरी पंडितांसाठी काम करत असताना भाजपच्या ताब्यातील सरकारे या प्रश्नावर केवळ राजकारण करत आहेत हे लोकांना कळत आहे.*

*भाजपचा दुटप्पी चेहरा हा विद्रुपपणे लोकांच्या समोर आल्याने चिडून, घाबरून जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे.*

*याप्रकरणातील भाजपचे ग्रृहमंत्री अमीत शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच दोषी भाजपाचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी चंद्रपूर आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.*

यावेळी जिल्हा प्रमुख सुनिल देवराव मुसळे, महिला अध्यक्षा सुनिता ताई पाटील, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा युवा अध्यक्ष मयुर राईवार, जिल्हा महानगर सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार्, शहर सचिव राजु कुडे, ऑटो संघटण अध्यक्ष शंकर धुमाळे, योगेश आपटे, सिकंदर सागोरे, चंदू माडुरवार ,अक्षय गवालपंच्छी,सुनील सदभैया, अक्षय आंबेकर, संजय रामने, सुनील पोचारे, कालिदास ओरके, उमेश कडू, वीरेंद्र यादव, महेश सिंग, अजय भोयर, रवींद्र भोयर, लक्ष्मन पाटील, नामदेव स्वान , सुशांत धकाते, भिमराव मेंढे, प्रीती अंबेकर, सुबाद्रा मून, सुजाता बोदेले, पूजा खोलारे, पोटेश्वरी गोहाणे, रूपा काटकर, आरती आगलावे, सुमन साव, मंगला मुक्के, लिलाबाई नवघरे, शबांना शेख, इत्यादी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.