धिरेंद्र शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर विरोधात तिरोडा परमात्मा एक सेवक च्या कार्यकर्त्यांचा आक्रोश…..
आमदार विजयभाऊ राहांगडाले, माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड आणि हजारो सेवकांनी दिले निवेदन.

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथे आज हजारो च्या संख्येने परमात्मा एक सेवक एकत्रित झाले. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात बाबा बागेश्वर उर्फ धिरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन सुरु आहे. त्यांनी प्रवचन दरम्यान परमात्मा एक सेवक चे संस्थापक बाबा जुमदेव यांच्या बद्दल अप शब्दाचा वापर आपल्या प्रवचना मध्ये केला आहे. त्याचे विरोधात संपूर्ण नागपूर, भंडारा, आणि गोंदिया जिल्ह्यात बागेश्वर बाबा यांच्या विरोधात परमात्मा एक सेवक च्या कार्यकर्त्यांचा आक्रोश निर्माण झाला आहे, प्रत्येक जिल्ह्यातील तालुकाच्या ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे, त्याच प्रमाणे तिरोडा तालुक्यातील परमात्मा एक सेवक चे कार्यकर्ते तिरोडा इथे जुनी नगर परिषद मैदानासमोर एकत्रित झाले आणि त्यांनी बाबा बागेश्वर उर्फ धिरेंद्र शास्त्री च्या विरोधात नारे दिले, या नंतर सर्व कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक देविदास पठोले यांना निवेदन दिले. तत्पूर्वी आमदार विजयभाऊ रहांगडाले, माजी आमदार व गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पिंटू रहांगडाले,काँग्रेस तालुका अध्यक्ष v कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश टेमभरे, जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालूभाऊ )बावणथडे यांनी निषेध जाहीर करीत धिरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी केली.









