उज्ज्वल भविष्य मैत्रेयी ग्रंथालय चे अलिबाग उद्घाटन

उज्ज्वल भविष्य मैत्रेयी ग्रंथालय चे अलिबाग उद्घाटन

उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांनी ग्रंथालयात जाऊन अभ्यास केला पाहिजे. – रमेश धनावडे

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे, अलिबाग, च्या तृतीय वर्धापन दिनाचे निमित्त साधत उज्ज्वल भविष्य मैत्रेयी ग्रंथालयाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यीक रमेश धनावडे व तेजस्विनी फाउंडेशन च्या अध्यक्षा ॲड जीविता पाटील यांच्या हस्ते रविवार दि.30 मार्च 2025 रोजी उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना, पिंपळभाट अलिबाग येथे करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव, जन शिक्षण संस्थान रायगड चे अध्यक्ष उज्ज्वल भविष्याचे सल्लागार डॉ.नितीन गांधी, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान, जे एस एस संचालक डॉ. विजय कोकणे, सुरभी स्वयंसेवी संस्था अध्यक्षा सुप्रिया जेधे, जिल्हा आरोग्य विभाग भगवान जाधव, वडके कॉलेज चोंढी प्राध्यापक सचिन गोंधळी, डॉ. काशिनाथ स्वामी, जिल्हा सामान्य रुग्णालय पॅथॉलॉजिस्ट रेखा पाटील, पत्रकार अँड. रत्नाकर पाटील, डॉ. धनंजय शिंदे अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्ष सिग्नल स्कूल संचालक नितीन राऊत, अलिबाग क्रिकेट सदस्य संदीप जोशी, रोशन पंडित, उज्ज्वल भविष्य समन्वयक राजन पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ नितीन गांधी यांनी संस्थेची माहिती सांगून भविष्यातील प्रयोजन सांगितले व पाहुण्यांचे स्वागत केले.

वाचनाची आवड निर्माण होण्याकरिता प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी ग्रंथालयाचा उपयोग करावा मोबाईलचा वापर कमी करून ग्रंथालयातील पुस्तके वाचून ज्ञान वाढवून घेणे खूप महत्त्वाचे आहे असे समाजसेविका जीविता पाटील यांनी सांगितले.

ग्रंथालयातील पुस्तके, ग्रंथ यांचा संदर्भ घेऊन विविध लेखन केल्याचे ज्येष्ठ साहित्यिक रमेश धनावडे यांनी अनुभव सांगितला. त्याच बरोबर प्रत्येकाने ग्रंथालयाचे सदस्य होऊन पुस्तक वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.यावेळी वाचक वर्ग, व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.