कल्पतरू अकॅडमीच्या वतीने नवोदय पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

कल्पतरू अकॅडमीच्या वतीने नवोदय पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

गडचिरोली : आज ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कल्पतरू अकॅडेमीच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक व कल्पतरू अकॅडेमीच्या परिश्रमशील अध्यापन पद्धतीला दिले.
गेल्या १५ वर्षांपासून निकालाची परंपरा कायम ठेवणाऱ्या कल्पतरू अकॅडेमीने यंदाही आपली उज्वल परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वी व ९ वी प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी प्रवेशासाठी झालेल्या नवोदय पूर्व परीक्षेत कल्पतरू अकॅडेमीच्या प्रांजली कोहळे हिने ओ.बी.सी. मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, इयत्ता ६ वी प्रवेशासाठी झालेल्या नवोदय पूर्व परीक्षेत कल्पतरू अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय मान पटकावली. यामध्ये सुफल सुनील नन्नावरे याने शेड्युल ट्रायब (शहरी) गटात प्रथम क्रमांक मिळवला, तर ग्लोरी संदीप खोब्रागडे हिने शेड्युल कास्ट (ग्रामीण) गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून अकॅडेमीचा नावलौकिक वाढवला. तसेच, रुज्वल पद्माकर मानकर हाही इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी झालेल्या पूर्व परीक्षेत यशस्वी ठरला.
या कार्यक्रमास कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कृणाल पडलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या वतीने पुढील वर्षी २०२६ मध्ये होणाऱ्या नवोदय, सैनिक व शिष्यवृत्ती पूर्व परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग जून व जुलै महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांची नावनोंदणी त्वरित करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.