अमरावती जिल्हाधिका-यांकडून ग्रामीण रुग्णालयांच्या अधिक्षकांशी चर्चा ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा.

आवश्यक सुविधा,मनुष्य बळाबाबत प्रस्ताव द्यावेत: जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती जिल्हाधिका-यांकडून ग्रामीण रुग्णालयांच्या अधिक्षकांशी चर्चा ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा.
अमरावती जिल्हाधिका-यांकडून ग्रामीण रुग्णालयांच्या अधिक्षकांशी चर्चा ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अमरावती:- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिक्षकांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोविडसंदर्भात रुग्णांना उत्तम उपचार मिळवून देण्यासाठी उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये सुसज्ज ठेवावीत. त्यासाठी लागणा-या सर्व आवश्यक साधनसामग्रीबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावेत. आवश्यक मनुष्यबळाबाबतही माहिती द्यावी. म्युकरमायकोसिसबाबत ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती करावी. म्युकरमायकोसिसचे लवकर निदान होणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

अमरावती शहराहून लांब अंतरावर असलेल्या गावांतील रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेंटरची उभारणी आवश्यक आहे. त्यासंबंधी सविस्तर प्रस्ताव द्यावा. आवश्यक साहित्य, मनुष्यबळ आदी सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. रुग्णांना विनामूल्य उपचार महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेत मिळाले पाहिजेत. त्यानुषंगाने या योजनेचा अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी दिले.

म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड व 40 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी आज भेट देऊन पाहणी केली. कोरोनाबाधित बरे झाल्यानंतरच्या काळात अधिक काळजी घेतली गेली पाहिजे. त्यानुसार बरे होऊन घरी परतणा-या रुग्णांना पोस्ट कोविड घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करावे, तसेच त्यांच्याशी त्यानंतरही नियमित संपर्क व समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here