सर्वच डॉक्टर्स देव असतात पण काही डॉक्टर्स पैश्याच्या बाबतीत दानव का बनतात ?
सर्वच डॉक्टर्स देव असतात पण काही डॉक्टर्स पैश्याच्या बाबतीत दानव का बनतात ?

सर्वच डॉक्टर्स देव असतात पण काही डॉक्टर्स पैश्याच्या बाबतीत दानव का बनतात ?

सर्वच डॉक्टर्स देव असतात पण काही डॉक्टर्स पैश्याच्या बाबतीत दानव का बनतात ?
सर्वच डॉक्टर्स देव असतात पण काही डॉक्टर्स पैश्याच्या बाबतीत दानव का बनतात ?

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, या चालत असलेल्या कोरोना काळात 21660 रुपये रक्त तपासणीचे आकारण्यात आले एवढे काय तपासले असेल तसेच ऑक्सिजन विना नऊ दिवसाचे 6500 रुपये प्रति दिन प्रमाणे 58500 व P P E किटचे 5400 रुपये आकारण्यात आले असे एकूण 85560 रुपये बिल आकारण्यात आले. नियमाप्रमाणे पक्के बिल मागताच 50000 रुपयापर्यंत बिल आले डायरेक्ट 35560 रुपये कमी झाले. हाच आहे महाराष्ट्रात एक आमदार असणार्‍या मनसेचा पॉवर सर्व सोयी सुविधा युक्त एखाद्या 5 स्टार हॉटेल च्या खोली पेक्षाही जास्त भाडे हॉस्पिटलच्या एका खोलीचे आकारले जाते. एक खोली ज्या खोलीत 2 व्यक्ती अ‍ॅडमिट आहे अश्या खोलीचे एका दिवसाचे भाडे प्रति व्यक्ती 6500 म्हणजे एका दिवसाला 13000 रुपये आहे.

31 ऑगस्ट 2020 ला महाराष्ट्र सरकारने कोरोना उपचाराकरिता दर ठरवून दिले आहे तरी देखील खाजगी हॉस्पिटल तर्फे रुग्णांची आर्थिक लूट सुरूच आहे. मागील वर्षभराहून जास्त लॉकडाऊन आहे या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या,व्यवसाय ,रोजगार बंद आहे. सर्वसामान्य मध्यम वर्गीय माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे. गरिबांची तर काही गत नाही .अश्या परिस्थितीत येवढी खाय खाय योग्य आहे का? त्या कुटुंबाची काय अवस्था असेल ज्या कुटुंबातील प्रमुख कमावता व्यक्तीच कोरोना आजाराने ग्रस्त झाला आहे दवाखान्यात उपचार घेत आहे विचार देखील करवत नाही. शेतकरी, मजूर यांचे तर हालच हाल आहे.

आवश्यक सर्व तपासण्या काही औषधी,ऑक्सिजन,रेग्युलर चेकअप, बेड चार्ज, नर्सिंग चार्ज, जेवण व इतर महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या दरामध्ये अंतर्भूत केल्या आहे तरी देखील रक्त तपासणी, औषधे, ऑक्सिजन, रेग्युलर चेकअपच्या नावाखाली अतिरिक्त पैसे रुग्णांकडून उकळल्या जात आहे. त्याच बिल देखील दिल्या जात नाही आणि औषधीचा खर्च हा वेगळाच आहे. एकच PPE किट घालून सर्व रुग्ण तपासणी करतात तरी देखील सर्व रुग्णांकडून PPE किट चे पैसे घेतात रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा जरा देखील विचार केला जात नाही. Covid हॉस्पिटलला शासनाच्या वतीने नेमण्यात आलेले नोडल ऑफिसर व ऑडिटर हे तर विकलेच गेले आहे.जनतेचा कुणी वाली उरला नाही.असच आता सामान्य माणसाला वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here