भास्कर कारे याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी.
प्रतिनिधी : नजीर पठाण (तळा, रायगड)
८८८८२६१०२१
तळा | नजीर पठाण | तळा येथील शेनाटे गावाजवळ दिनांक 23.05.2022 रोजी दुपारी साधारण 12.00 वाजण्याच्या सुमारास दिनेश बटावले यांना रिक्षा घेऊन जाताना जबर मारहाण करण्यात आली होती. ते गंभीर जखमी असल्याने त्यांना मुंबई येथे तातडीने हलवण्यात आले होते. मारहाणी मुळे त्यांची तब्येत जास्त खालवल्याने त्यांची मृत्युशी चालली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. यातील एक बाब महत्वाची आहे ती म्हणजे त्यांचा मृत्यू पूर्वीचा मुंबईतील जवाब, त्या जवाबत माझ्यावर चार जणांनी हल्ला केला होता. मी शेनाटे ते तळा असा प्रवास करत असताना चौघा नीं म्हणजे गणेश बटावले, भास्कर कारे, रुपेश बटावले आणि राकेश बटावले यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला स्मशानाजवळ नेऊन बरीच मारहाण केली. त्यांच्या जवळ असलेल्या लोखंडी रॉड, लाकूड, दगडाने माझ्या डोक्यात, छातीवर, पायावर दुखापत केली. अजून बरीचशी सविस्तर माहिती मारणापूर्वीच्या जवाबत दिनेश ने नोंदवली आहे.
त्यातील दोन आरोपी भास्कर कारे आणि राकेश बटावले अद्यापही फरार आहेत. या दोन्ही आरोपीना पकडण्यात आजून पोलीस अपयशी ठरले आहेत. आज आठ दिवस उलटून देखील भास्कर कारे आणि त्याचे साथीदार फरार असल्याने पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.
भास्कर कारे हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता होता. त्याच्यावर असलेल्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत होती आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भास्कर कारे याची पक्षातून हकालपट्टी केली आहे याची अधिकृत घोषणा श्री नाना भौड (तळा तालुका अध्येक्ष राष्ट्रवादी पार्टी) यांनी केली आहे. दिनेश बटावले याचे आरोपी अद्याप फरार आहेत त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावे असे लेखी पत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेत श्री.नाना भौड, ऍड.उत्तम जाधव, श्री.चंद्रकांत राऊत, श्री.कैलास पायगुडे, श्री.किशोर शिंदे, श्री.तन्वीर पल्लवकार आणि शेनाटे ग्रामस्थ उपस्तित होते.