शहादा तालुक्यातील धुरखेडा शिवारात वीज खांब्यावरील ४९ हजारांच्या तारा चोरट्यांनी लंपास केले
शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे मो नंबर 9325534661
शहादा तालुक्यातील धुरखेडा शिवारातून चोरट्यांनी ४ ९ हजार ५०० रुपयांची वीजतार चोरून नेल्याची घटना घडली शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुरखेडा शिवारातील जगन्नाथ केशव पाटील यांच्या व यादव पाटील यांच्या शेत गटातून गेलेली अल्युमिनियमची वीजतार चोरट्यांनी कापून नेल्या. तीन खांबच्या दरम्यानची ही तार असून, एकूण दोन हजार ५०० मीटर इतकी तिची लांबी आहे. बाजारभावानुसार तिची किंमत ४९ हजार ५०० रुपये असल्याचे वीज कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर त्यांना वीजतार तोडलेल्या आढळल्या. चोरट्यांनी पूर्वीप्रमाणेच त्या कापून चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वीज कंपनीला कळविण्यात आले. याबाबत वीज कंपनीचे अधिकारी चतुर विनायक नेरपगार यांनी फिर्याद दिली.