गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षासह सर्व मुख्य नेते व कार्यकर्ता समूहाचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा…..
गोंडपिपरी बाजार समितीचा प्रताप; कोट्यवधीची लूट असतानासुद्धा त्या भ्रष्टाचारी सचिवास पाठीशी घालून पूर्ववत रुजू करण्याचा संचालकांचा प्रयत्न….
सत्त्याला लाथ..! असत्याला साथ..! ही भूमिका आली गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अंगलट…..
शरद कुकूडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.न.9518727596
गोंडपिपरी :- कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी येथील मागील कालखंडातील सचिव पदावर कार्यरत असलेल्या श्री.सोनटक्के यांनी सचिव पदाचा दुरुपयोग करून अनेक प्रकारे बाजार समितीची लूट केल्याचा आरोप झालेला होता. या सचिवांच्या मनमानी कारभाराला व भ्रष्टाचारी वृत्ती ला बघून संचालक मंडळांनी त्यांना दिनांक १९/०७/२०२१ रोजी बहुमताने त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात व त्यांची चौकशी करण्याची जबाबदारी तत्कालीन बाजार समितीचे उपसभापती श्री.अशोकभाऊ रेचनकर यांच्यावर चौकशी समिती नेमून देण्यात आली होती. समिती पाच लोकांची नेमण्यात आली व त्या समितीत चौकशी समिती अध्यक्ष श्री. अशोक रेचनकर, विनोद नागापुरे, साईनाथ कोडापे, अभय शेंडे, भारत झाडे यांनी मेहनत घेऊन २१ मुद्द्यांचा आरोप श्री. सोनटक्के यांच्यावर लावण्यात आला होता. मूळ मुद्दा क्र.१०वर सचिवाने स्थळप्रत व मुळप्रत यांच्यात परस्पर माया जमविण्याचा हेतूने चारशे विसी केलेली आहे असे रेचनकर यांनी सांगितले.
पुढे श्री.रेचनकर म्हणाले की, त्यांनी अनेक व्यापाऱ्याकडून दहशतीच्या नावाखाली गैरमार्गाने बाजार समितीचा कुठल्याही प्रकारे फायदा न करता स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतलेला होता. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानुसार कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला असल्याचे दिसून आलेले आहे.अशी माहिती बाजार समितीचे तत्कालीन उपसभापती मा. अशोक रेचनकर यांनी दिली.
सदर प्रकरण मा. विभागीय निबंधक नागपुर यांच्याकडे चालू होते.त्या प्राथमिक अहवालाची मुद्देसूद चौकशी न करता व नकली पावत्यांच्या कोणत्याही प्रकारचा विचार न करता मा. विभागीय सहनिबंधक यांनी दि.०९/०३/२०२२ रोजी आदेशान्वये त्या भ्रष्टाचारी सचिवास पूर्ववत सुरू करून घेण्याचे आदेश दिले. परंतु त्याच्या आदेशाविरुद्ध पुढील न्यायालयात अपील न करता तत्कालीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्या भ्रष्टाचारी सचिवास सेवेत रुजू करून घेण्यासाठी केविलवाणी धडपड केलेली आहे.व दि.२९/०५/२०२२ रोजी झालेल्या सभेत सभापती सुरेश चौधरी यांनी सात विरुद्ध तीन मताने त्या भ्रष्ट सचीवास पूर्ववत सामावून घेण्यासाठी ठराव पास केलेल्याबाबत माजी उपसभापती अशोक रेचनकर यांनी सांगितले.
त्या भ्रष्टाचारी सचिवास भ्रष्टाचार केलेला नाही म्हणून पुन्हा त्याला सेवेत सामावून घेणे ही कुठली पद्धत आहे. त्यामुळे आर्थिक घोडेबाजार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.संबंधित सचिवाला पूर्ववत सेवेत रुजू करून घेतल्यास सर्व शेतकरी वर्गाची व व्यापारी वर्गाची फसवणूक कार्यरत संचालक मंडळाकडून झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर संचालक मंडळ शेतकऱ्यांचे, व्यापार्यांचे हीत न जोपासता त्या भ्रष्टाचारी सचिवाचे हित जोपासत आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व व्यापारी वर्गात असंतोषाचा वणवा पेटत आहे. जर संबंधित सचिव रुजू झाल्यास चौकशी समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी उपसभापती श्री.अशोक रेचनकर यांनी बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीकोनातून संचालकांच्या ठरावाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शविली आहे. तसा इशारा सुद्धा श्री. रेचनकर यांनी दिलेला आहे.
गोंडपिपरी बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचे बहुमत असताना सुद्धा त्या भ्रष्टाचारी श्री. सोनटक्के यांना पूर्ववत सामावून घेणे ही बाब गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची, व्यापारी वर्गाची, काँग्रेस पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्त्यांची थट्टा करणारी आहे.असा प्रकार ही बाब पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून व बाजार समितीच्या दृष्टिकोनातून हानीकारक आहे.
अनेक वर्षापासून आम्ही सर्व काँग्रेस पदाधिकारी नेते,व कार्यकर्ते एकनिष्ठने,तनमनधनाने काम करीत असताना अशी बाब पदाधिकाऱ्यांच्या व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनाला भिडणारी असल्यामुळे, सत्याला लाथ!! आणि असत्याला साथ !! असा प्रकार घडल्याने, याचा जाहीर निषेध म्हणून आज दि.२९/०५/२०२२ ला गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी सर्वांच्या सह्यानीशी आमदार मा. सुभाष धोटे यांना सामूहिक राजीनामे पत्राद्वारे पाठविलेले आहे.असे सामूहिक राजीनामे सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे.