शेतमजुरचा दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, प्रतिकार करताना मजुराचा मृत्यू

शेतमजुरचा दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, प्रतिकार करताना मजुराचा मृत्यू

शेतमजुरचा दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, प्रतिकार करताना मजुराचा मृत्यू
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

चंद्रपूर : शेतात कामास गेलेल्या शेतमजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी (३१ मे) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. रामभाऊ कारु मरापे (४३) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व वनविभाग पुढील प्रक्रिया पार पाडत आहे.मूल येथील हरडे यांच्या मालकीच्या शेतात रामभाऊ मरापे हे शेतमजूर म्हणून कामाला होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजता रामभाऊ मरापे मशागतीसाठी शेतात जात होते. त्यावेळी लगतच्या नाल्यामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळाच्या निरीक्षणावरून रामभाऊ मरापे यांनी हल्ला परतवून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचं दिसत आहे. परंतु हत्यारा अभावी ते वाघाचा सामना करण्यात अपयशी ठरले आणि यातच त्यांना आपले प्राण गमवावे लागले. झालेल्या हल्ल्यात रामभाऊ मरापे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळ हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येत असून सभोवताली घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परीसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. परिसरात यापूर्वी अनेकदा वाघाच्या हल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघाच्या हल्यात आजपर्यंत या परीसरात तीन व्यक्तींना आणि अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here