शिवराया विद्यार्थी संघटने तर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती थाटात साजरी-कु.अवनी पडवे हिच्या हस्ते पूजन..

 

शिवराया विद्यार्थी संघटने तर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती थाटात साजरी-कु.अवनी पडवे हिच्या हस्ते पूजन..

शिवराया विद्यार्थी संघटने तर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती थाटात साजरी-कु.अवनी पडवे हिच्या हस्ते पूजन..

अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

प्रतिनिधी/अल्लीपुर
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकऱ्यांसाठी कर माफी, शाळांच्या स्थापनेद्वारे विद्याप्रसार तसेच अंधश्रद्धा निवारण अशी अनेक समाजोद्धाराची कार्ये केली आहे.त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे, नदीघाट बांधले,त्यांनी अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र ठिकाणी धर्मशाळांचे सुद्धा बांधकाम केले,सती परंपरेला सुद्धा त्यांनी फाटा दिला, अश्या न्यायनिष्ठ, दानशूर व अतिशय कर्तृत्ववान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने फोटो पूजन व माल्यार्पण कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन स्थानिक शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कु.अवनी धनंजय पडवे हिच्या हस्ते फोटोपूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी,गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वस्वी गजानन नरड माजी सरपंच,गोपाल मेघरे सोसायटी सदस्य,सचिन पारसडे ग्रा.प.सदस्य,संदीप नरड शिवसेना शाखा प्रमुख,धनंजय पडवे,पंकज उरकुडे, नितीन पडवे,पवन भोयर,पंकज पडवे,स्वप्नील ढवळे हे उपस्तीत होते यावेळी आयोजनासाठी शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर उपाध्यक्ष विकास गोठे,सचिव मयुर डफ,साहिल गोठे,निशांत लांभाडे,श्रुनय ढगे ,रोशन नरड,समीर मेघरे,हर्षद अवचट,हृषीकेश कोमुजवार इत्यादी कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते…