देशमुख कांबळे बिर्ला कंपनीतील कंत्राटी ठेक्यावरून झालेला वाद अखेर संपला,,प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मध्यस्थीने वादाला पूर्णविराम

✍️रामदास चव्हाण✍️
बिरवाडी महाड प्रतिनिधी
📞7276705457📞

महाड:-मागील काही दिवसांपासून महाड एमआयडीसीतील बिर्ला कंपनीतील कंत्राटी ठेक्याचा वाद चांगलाच रंगला होता. देशमुख कांबळे येथील भूमिपुत्र असलेले नागेश देशमुख यांनी विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते, तसेच पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज देखील दाखल केला होता. यापुढे वाद आणखी चिघळला आणि उपोषणापर्यंत पोहोचला. आज देशमुख कांबळे येथील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती यांच्या मध्यस्थीने या संपूर्ण वादाला पूर्णविराम मिळाला आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे जाऊन बैठक घेतली व या बैठकीमध्ये झालेला वाद हा गैरसमजुतेमुळे झाला असून आमच्या गावामध्ये यापुढे कोणताही वाद होणार नाही व आमचे संपूर्ण गाव एकत्र आहे असा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष सुनील देशमुख, बंडूशेठ देशमुख, आप्पा देशमुख, अशोक देशमुख, राजू कळमकर, महेंद्र देशमुख, समीर शिंदे, वैभव देशमुख, नागेश देशमुख असे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.