पावसापुर्वी रस्त्यावरील खड्यांची डागडुजी कधी पर्यंत पूर्ण होणार… नागरींकांचा संबंधित विभागाला प्रश्न
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनीधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: पावसाळा जवळ आला असता पावसाळ्या पूर्वी प्रशासकीय कामांना गती मिळते, नगरपंचायत कडुन नाले सफाई, महावितरण कडुन विदयुत तारांना अडथळा होणाऱ्या झाडांच्या फांदया तोडणे, पण बांधकाम विभागाडुन अध्याप पर्यंत रस्त्यांची डागडुडी करण्यात आली नसल्याने नागरिकांच्या मध्ये व प्रवाशांच्या मध्ये नाराजीचे सुर उमटत असताना दिसत आहेत, म्हसळा पंचायत समिती ते म्हसळा बस स्थानक ईथ पर्यंतचा रस्ता अगदी खड्डेमय अवस्थेत असताना संबधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे, या रस्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत, नागरिकांना व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत आहे, आत्ता पासुनच या रस्त्याची दुरावस्था आहे तर पावासाळ्यात काय होईल, या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करून मिळावी असे प्रवासी व नागरीकांची बांधकाम विभागाकडे मागणी आहे. तसेच ५०५४ (३) अर्थसंकल्पीय काम अंतर्गत म्हसळा बायबास सकलप ते बसस्थानक पर्यंतचा रस्ता फक्त पंचायत समिती पर्यंतच केला गेला असता पंचायत समिती ते बसस्थानक ईथ पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता होणार होता तो काम देखील अपूर्ण अवस्थेत आहे. तो रस्ता कधी पूर्ण होणार असा देखील नागरिकांकडुन प्रश्न उपस्थित होत आहे.