रायगड जिल्ह्याचे कृषी विभाग व्हेंटिलेटरवर ३७ पदे मंजूर,भरली फक्त १३,२४ पदे रिक्त खरीप हंगमाच्या तोंडावर शेतीचे साहित्य विकणाऱ्या केंद्राच्या तपासण्या खोळंबल्या

रायगड जिल्ह्याचे कृषी विभाग व्हेंटिलेटरवर ३७ पदे मंजूर,भरली फक्त १३,२४ पदे रिक्त खरीप हंगमाच्या तोंडावर शेतीचे साहित्य विकणाऱ्या केंद्राच्या तपासण्या खोळंबल्या

रायगड जिल्ह्याचे कृषी विभाग व्हेंटिलेटरवर

३७ पदे मंजूर,भरली फक्त १३,२४ पदे रिक्त

खरीप हंगमाच्या तोंडावर शेतीचे साहित्य विकणाऱ्या केंद्राच्या तपासण्या खोळंबल्या

रायगड जिल्ह्याचे कृषी विभाग व्हेंटिलेटरवर ३७ पदे मंजूर,भरली फक्त १३,२४ पदे रिक्त खरीप हंगमाच्या तोंडावर शेतीचे साहित्य विकणाऱ्या केंद्राच्या तपासण्या खोळंबल्या

अलिबाग
रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३

अलिबाग :- भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या रायगड जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून कृषी विभाग आज व्हेंटिलेटर वर आहे. शेतीच्या महत्त्वपूर्ण खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मंजूर असलेल्या ३७ पैकी केवळ १३ पदे भरली असून, २४ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा कृषी अधिकारी या महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर विभागातील अधिकाऱ्याच्या खांद्यावर देऊन कृषी विभागाचा गाडा हाकला जात आहे. तालुकास्तरावरील कार्यालयातही हीच परिस्थिती असून, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे बियाणे, खतांच्या नमुन्यांपासून कृषी साहित्य विक्री केंद्रांच्या तपासणीची कामे खोळंबली आहेत.

रायगड हा कृषीप्रधान जिल्हा आहे. येथील अर्थव्यवस्था शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. सध्या खरीप पीक हंगामाच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामात जिल्ह्यात ९८ हजार ४८७ हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर ३ हजार २३ हेक्टरवर नागली लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे, खते, किटकनाशके कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. बियाणे, खते, किटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्यासाठी विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या सर्व प्रयत्नांना अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता कृषी विभागाला भेडसावत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे बियाणे, खतांच्या नमुन्यांपासून कृषी साहित्य विक्री केंद्रांच्या तपासणीची कामे खोळंबली आहेत.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मंजूर असलेल्या ३७ पैकी केवळ १३ पदे भरली असून, २४ पदे रिक्त आहेत. जिल्हा कृषी अधिकारी पदासह कृषी उपसंचालक पद रिक्त आहे. तसेच वर्ग २ ची ८ पदे मंजूर असून यामधील केवळ १ पद भरण्यात आले आहे, तर ७ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या २० मंजूर पदांपैकी ८ पदे भरली असून, १२ पदे रिक्त आहेत. तर वर्ग ४ च्या मंजूर ७ पदांपैकी ४ पदे भरली असून, तीन पदे रिक्त आहेत.

जिल्ह्याचा कारभार आत्मा प्रकल्प संचालकांच्या हाती

जिल्हा कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखळे यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली. मात्र बाणखळे यांच्या जागी दुसऱ्या कृषी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. सध्या आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांच्याकडे कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवून जिल्हा कृषी विभागाचा गाडा हाकला जात आहे. तसेच कृषी अधिकारी यांच्या खालोखाल असलेले कृषी उपसंचालक पदही रिक्त आहे. प्रमुख दोन अधिकाऱ्यांची पडे रिक्त असल्याने त्याचा विपरीत परिणाम कृषी विभागाचा कारभारावर होत आहे.