20 अंध युवक बनले आरोग्य दूत. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान चा अलिबाग मध्ये स्वाधार पुनर्वसन पॅटर्न

20 अंध युवक बनले आरोग्य दूत. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान चा अलिबाग मध्ये स्वाधार पुनर्वसन पॅटर्न

20 अंध युवक बनले आरोग्य दूत.
ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान चा अलिबाग मध्ये स्वाधार पुनर्वसन पॅटर्न

20 अंध युवक बनले आरोग्य दूत. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान चा अलिबाग मध्ये स्वाधार पुनर्वसन पॅटर्न

किशोर पितळे-तळातालुका प्रतिनीधी ९०२८५५८५२९

तळा :- अलिबाग ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार दिव्यांगप्रशिक्षण व पुनर्वसनकेंद्र वरसोली-अलिबाग येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तर दायित्वकार्यक्रमांतर्गत सहा महिने कालावधीचा शास्त्रीय ॲक्युप्रेशर व मसाज चिकित्सा प्रशिक्षण कार्यक्रम राबवलाजातो.
दिव्यांगांच्या पुनर्वसनाची व्याख्याच बदलून टाकणारे स्वाधार केंद्र १९८१ पासून अविरतपणे ग्रामीण अंध अपंगांच्या प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. दिव्यांग समाजाकडून घेणारे नव्हे तर समाजाला भरभरून देणारे व्हावेत,याकरिता आधुनिक प्रशिक्षण व रोजगार संधी देण्याचे काम प्रतिष्ठान स्वाधार केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी करीत आहे. अलिबाग व कोकण भागातील दिव्यांग युवकांच्या पुनर्वसनासाठी प्रतिष्ठानने विभागीय प्रशिक्षण केंद्राची स्थापना फेब्रुवारी २०२३ रोजी केली.या विभागीय प्रशिक्षण केंद्रात मागील १वर्षांपासून अंध दिव्यांगांसाठी ॲक्युप्रेशर व मसाजचे प्रशिक्षण दिले जाते.६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे अंध दिव्यांगांचा या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या बॅचचा निरोप समारंभ व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षण घेतलेले हे अंध विद्यार्थी आता विविध आजाराने त्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी तयार झाले आहेत.” डोळे असून उपयोग नाही तर जगण्याची दृष्टी हवी आणि ही जगण्याची दृष्टी स्वाधार केंद्र या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अंध दिव्यांगांना देत आहे. आपण घेतलेले प्रशिक्षण हे तसेच न ठेवता त्याचा उपयोग करून आयुष्यात पुढे जावे ” असे यावेळी प्रमुख पाहुण्यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे सीएसआर मॅनेजर प्रसाद पाखरे, चीफ मॅनेजर एडमीन अँड एच आर नवनाथ इंगळे, डॉ. निशिकांत पाटील, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय अलिबाग, साउंड हिलींग थेरपिस्ट पल्लवी जांभोरे, जेष्ठ पत्रकार रुपेश पाटील, दर्शना पाटील, वरसोली ग्रामपंचायत सदस्या नमिता माळवी, पूजा खोत, व प्रतिष्ठान चे कार्यकारी विश्वस्त प्रशांत सुडे, सहसंचालिका प्रेरणा सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सुमित पाटील, हरिभाऊ घोडके, राहुल गवळी, सत्यजित गुरव आदींनी परिश्रम घेतले.
–प्रतिक्रीया—-
योग्य कौशल्य असूनही फक्त अंध असल्याने रोजगारासाठी व नोकरीसाठी संघर्ष करावा लागत होता.अंध असल्यामुळे कोणी रोजगार देण्यासही तयार न्हवते. पण स्वाधार मार्फत ॲक्युप्रेशर व मसाजचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे मी आज स्वतःच्या पायावरती उभा आहे. व मी स्वतः घरच्यांचा आधार बनलो आहे.

अभिषेक आमले ,अंध दिव्यांग